एप्रिल २०२५ मध्ये देशभरात २६,६३२ कोटी रुपयांची एसआयपी (Rise in SIP) गुंतवणूक झाली आहे. हा एक विक्रम असून एकाच महिन्यात झालेली ही विक्रमी गुंतवणूक आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाने जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे.
आकडेवारीनुसार, एप्रिल २०२५ मध्ये भारताच्या म्युच्युअल फंड उद्योगाने विक्रमी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन योगदान नोंदवले. ज्यामध्ये एकूण आवक २६,६३२ कोटींवर पोहोचली, जी कोणत्याही एका महिन्यातील आतापर्यंतची सर्वाधिक आहे. एप्रिलमध्ये १.३६ कोटी एसआयपी खाती बंद करण्यात आली किंवा परिपक्व झाली. असे असूनही, योगदान देणाऱ्या खात्यांची संख्या मार्चमध्ये ८.११ कोटींवरून ८.३८ कोटींवर पोहोचली आहे.
(हेही वाचा IPL 2025 : युद्धविरामाच्या बातमीनंतर गुजरात टायटन्सचा अहमदाबादेत सराव सुरू)
हे दीर्घकालीन संपत्ती निर्मितीमध्ये गुंतवणूकदारांची सततची आवड दर्शवते. एप्रिलमध्ये ४६ लाख नवीन एसआयपी (Rise in SIP) खाती जोडण्यात आली. तर गेल्या महिन्यात मार्चमध्ये ४०.१९ लाख खाती जोडली गेली. इक्विटी इनफ्लोमध्ये घट झाली असली तरी, म्युच्युअल फंड उद्योगात एकूणच प्रभावी वाढ दिसून आली आहे. एप्रिलमध्ये एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्ता (AUM) ₹७० लाख कोटींच्या नवीन विक्रमी पातळीवर पोहोचली, जी मार्चमध्ये ₹६५.७४ लाख कोटी होती.
एप्रिल २०२४ मध्ये एकूण आणि निव्वळ विक्रीच्या बाबतीत इक्विटी इनफ्लो मार्च २०२४ च्या बरोबरीचा आहे. बदलत्या बाजाराच्या ट्रेंडसह, इक्विटी श्रेणीतील एकूण गुंतवणूक आता जून/जुलै २०२४ मधील ८१,००० कोटी रुपयांवरून सुमारे ३०% ने कमी होऊन गेल्या तीन महिन्यांत सुमारे ५५,००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. एप्रिल महिन्यात निव्वळ इक्विटी इनफ्लो २४,००० कोटी रुपयांपेक्षा थोडा जास्त आहे, जो जून २०२४ मधील ४०,००० कोटी रुपयांपेक्षा जवळजवळ ४०% कमी आहे. म्युच्युअल फंड (Rise in SIP) हाऊसेसकडे असलेल्या सिक्युरिटीजचे सध्याचे बाजार मूल्य अॅसेट्स अंडर मॅनेजमेंट (AUM) असे म्हणतात.
Join Our WhatsApp Community