स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने Research Scholarships जाहीर

51

दादर, मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाद्वारे (Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak) तीन संशोधन शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आल्या आहेत. पंडित श्यामजी कृष्ण वर्मा संशोधन शिष्यवृत्ती, बाबाराव सावरकर संशोधन शिष्यवृत्ती आणि नारायणराव सावरकर संशोधन शिष्यवृत्ती यांची घोषणा करण्यात आली आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यावर विशेषतः क्रांतिकारकांची चळवळ आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे (veer savarkar) जीवन, विचार आणि योगदान यांवर शैक्षणिक संशोधन करण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या शिष्यवृत्ती देण्यात येणार आहेत. (Research Scholarships)

(हेही वाचा – Sunita Jamgade : पाकिस्तानातून परतलेली महाराष्ट्राची सुनीता जामगडे बीएसएफच्या रडारवर ; प्रकरण काय ?)

तरुण संशोधक आणि शिक्षणतज्ञांना या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील अज्ञात पण अत्यंत महत्त्वाच्या पैलूंचा सखोल अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे.

पंडित श्यामजी कृष्ण वर्मा (Pandit Shyamji Krishna Verma) यांच्या स्मरणार्थ प्रमुख शिष्यवृत्ती समर्पित आहे. परदेशातील भारतीय क्रांतिकारक चळवळीचे ते अग्रदूत मानले जातात. त्यांनी युवा विनायक दामोदर सावरकरांना शिष्यवृत्ती देऊन इंग्लंडला पाठवले. त्यांच्या या निर्णयामुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळीची दिशाच बदलली.

त्याचप्रमाणे, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मोठे बंधू गणेश दामोदर सावरकर (बाबाराव) आणि धाकटे बंधू नारायणराव सावरकर यांनी स्वातंत्र्य चळवळीत त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून कार्य केले. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातर्फे या तिन्ही संशोधन शिष्यवृत्तींच्या माध्यमातून सावरकर कुटुंबाच्या गौरवशाली वारशाला श्रद्धांजली अर्पण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

शिष्यवृत्तीचा तपशील

शिष्यवृत्ती                                            कालावधी                              मासिक शिष्यवृत्ती रक्कम
पंडित श्यामजी कृष्ण वर्मा                           १–२ वर्ष                                          २५,०००
बाबाराव सावरकर                                   ६ महिने – १ वर्ष                                १०,०००
नारायणराव सावरकर                                ६ महिने – १ वर्ष                                १०,०००

संशोधनासाठी स्वीकारल्या जाणाऱ्या भाषा –
१. इंग्रजी
२. हिंदी
३. इतर भारतीय भाषा (संशोधन परिषदेच्या परवानगीने)

प्रमुख संशोधन विषय
  • भारताचा स्वातंत्र्यसंग्राम (Indian independence movement), विशेषतः सशस्त्र क्रांती आणि परदेशी भारतियांची भूमिका
  • स्वातंत्र्य चळवळीतील सावरकरांची भूमिका
  • सावरकरांचे साहित्यिक आणि वैचारिक योगदान
  • सामाजिक सुधारणा, लोकशाही, संविधान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांवर सावरकरांचे विचार
  • राष्ट्रीय सुरक्षेवरील त्यांची रणनीतिक दृष्टी
  • हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्रवादाची त्यांची परिकल्पना आणि तिची सध्याची प्रासंगिकता
  • भारताची फाळणी आणि अखंड भारताची संकल्पना
  • भारतीय इतिहास आणि सभ्यतेवर सावरकरांची दृष्टी, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विचारधारा, चळवळी आणि नेत्यांचा सावरकरांच्या विचारांच्या संदर्भात तुलनात्मक अभ्यास
संशोधन परिषद आणि मार्गदर्शक मंडळ

शिष्यवृत्तींची निवड, मार्गदर्शन आणि संशोधनाची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी संशोधन परिषदेमध्ये सहभागी तज्ञ

  • श्री. प्रवीण दीक्षित – अध्यक्ष, सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि निवृत्त आयपीएस अधिकारी
  • डॉ. रिझवान कादरी – सदस्य, पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय (PMML) सोसायटी
  • श्री. प्रखर श्रीवास्तव – प्रसिद्ध पत्रकार आणि इतिहास-समीक्षक
  • श्री. चंद्रशेखर साने – वीर सावरकर विषयातील ख्यातनाम विशेषज्ञ
  • श्री. चिरायू पंडित – लेखक, संशोधक आणि शिक्षणतज्ञ
महत्त्वाच्या तारखा
  • अर्ज प्रक्रिया सुरू – २८ मे २०२५, बुधवार
  • अंतिम तारीख – २६ जून २०२५, गुरुवार
  • प्रस्ताव मूल्यांकन/मुलाखत – २८ जून – ८ जुलै २०२५
  • निवडीची घोषणा – १० जुलै २०२५, गुरुवार
  • शिष्यवृत्ती प्रारंभ – १ ऑगस्ट २०२५, शुक्रवार

या शिष्यवृत्ती केवळ संशोधनाला प्रोत्साहन देत नाहीत, तर स्वातंत्र्यसंग्रामातील त्या अमर वीरांची गाथा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे माध्यम देखील आहेत. इच्छुक उमेदवारांना विनंती आहे की, अर्ज करण्यापूर्वी शिष्यवृत्तीच्या अटी आणि नियमांचा त्यांनी चांगल्या प्रकारे अभ्यास करावा, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या वतीने करण्यात आले आहे. (Research Scholarships)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.