-
ऋजुता लुकतुके
सलग दोनदा रेपो दरकपातीनंतर जून महिन्यातील पतधोरण बैठकीतही रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा दर कपातीचंच धोरण कायम ठेवतील अशी दाट शक्यता आहे. येत्या ४ जूनपासून पतधोरणविषयक समितीची बैठक मुंबईत होणार आहे. रेपो रेट २५ बेसिस पॉईंटनं कमी केला जाऊ शकतो, अशी आशा आहे. यासंदर्भातील वृत्त बिझनेस स्टँडर्ड या इंग्रजी दैनिकानं दिलं आहे. आरबीआयनं रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतल्यास तो ५.७५ टक्क्यांवर येऊ शकतो. (Repo Rate)
एप्रिल महिन्यातील किरकोळ महागाईचा दर गेल्या सहा वर्षात निचांकी पातळीवर आहे. एप्रिल महिन्यातील किरकोळ महागाईचा दर ३.१६ टक्के आहे. खाद्य पदार्थ महागाईचा दर ऑक्टोबर २०२१ पासून पहिल्यांदा निचांकी पातळीवर आहे. डाळ आणि धान्याच्या किमती घटल्या आहेत. मान्सूनचा पाऊस चांगला होऊ शकतो हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळं सर्व परिस्थितीचा विचार करता रेपो रेटमध्ये कपात केली जाऊ शकते. (Repo Rate)
(हेही वाचा – India A Team to England : अभिमन्यू ईश्वरन भारतीय अ संघाचा कर्णधार; ध्रुव जुरेल उपकर्णधार)
नोमुराच्या एका रिपोर्टनुसार २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत महागाईचा दर ३ टक्क्यांच्या खाली राहू शकतो. तर, दुसऱ्या सहामाहीत तो ३.३४ टक्के राहू शकतो. आरबीआयच्या नियमानुसार महागाईचा दर ४ टक्क्यांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे. आरबीआयकडून २०२५-२६ मध्ये अजून ५ वेळा पतधोरण जाहीर केलं जाणार आहे. त्यामुळं रेपो रेट ५ टक्क्यांवर येऊ शकतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून एप्रिल २०२५ मध्ये पतधोरण जाहीर करताना सर्वसमावेशक धोरण ठेवलं होतं. त्यावेळी रिजर्व्ह बँक ऑफ इंडियानं महागाई कमी करण्याऐवजी विकासाला प्राधान्य देण्याची भूमिका ठेवली होती. (Repo Rate)
मध्यवर्ती बँकेकडून जेव्हा रेपो रेट कमी केला जातो तेव्हा गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना फायदा होतो. बँकांकडून गृह कर्ज आणि वाहन कर्जाच्या व्याज दरात कपात केली जाते. याचा फायदा नव्यानं कर्ज घेणाऱ्यांना होतो किंवा ज्यांनी कर्ज रेपो रेट प्रमाणं बदलणाऱ्या व्याज दरावर घेतलेलं आहे, त्यांना देखील याचा फायदा होतो. (Repo Rate)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community