नाल्यातील काढलेला गाळ दोन दिवसांत हटवा; DCM Eknath Shinde यांनी सफाईच्या कामाला दिली ७ जूनची डेडलाईन

400
नाल्यातील काढलेला गाळ दोन दिवसांत हटवा; DCM Eknath Shinde यांनी सफाईच्या कामाला दिली ७ जूनची डेडलाईन
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 

मुंबई शहर आणि उपनगरात सुरू असलेली नालेसफाईची सर्व कामे येत्या ७ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी महापालिका प्रशासनाला दिले. वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या, नालेसफाईच्या कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे सांगत नाल्यातून काढलेला गाळ ४८ तासांच्या आत उचलला जावा असेही निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास नालेसफाईच्या कामाच्या पाहणीस सुरूवात केली. भांडुप येथील उषा नगर, उषा कॉम्प्लेक्स, नेहरूनगर नाला वडाळा, दादर येथील धारावी टी जंक्शन जवळील नालेसफाईची पाहणी त्यांनी केली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर, माजी खासदार राहुल शेवाळे, आमदार तुकाराम काते, माजी आमदार सदा सरवणकर, महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. मुंबई महानगरात आतापर्यंत झालेल्या कामांची माहिती यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली.

New Project 2025 05 23T201122.466

(हेही वाचा – मोबाईल बॅन! पण टेन्शन नाही; Polling Center बाहेर असणार आता ‘ही’ खास व्यवस्था)

पाऊस वेळेआधीच सुरू झाला असला सांगून तरीही नालेसफाई वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी यावेळी दिले आहेत. आतापर्यंत मोठ्या नाल्याची ८५ टक्के तर छोट्या नाल्यांची ६५ टक्केपर्यंत सफाई पूर्ण झाली असून अजूनही १५ दिवस हातात आहेत. त्यामुळे हे काम वेळेत पूर्ण होईल असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

मुंबई महापालिका, रेल्वे प्रशासन यांच्या समन्वयाने नालेसफाई सुरू आहे. त्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. रेल्वेच्या कल्व्हर्टचा खालील परिसर कचरा रोबोटच्या मदतीने स्वच्छ करण्यात येत आहे. महापालिकेने दरवर्षी पाणी साचणारी ठिकाणे निश्चित केली असून ४२२ ठिकाणी पंप लावले आहेत तर २ ठिकाणी होल्डिंग पौंड आणि १० ठिकाणी छोटे पंपिंग स्टेशन कार्यान्वित केले असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

New Project 2025 05 23T201158.514

(हेही वाचा – Raigad Fort Update: पर्यटकांनो लक्ष द्या! किल्ले रायगडावरील पायरी मार्ग मेच्या ‘या’ दिवशी राहणार बंद)

यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी विक्रोळी येथील सूर्या नगर या दरड प्रवण क्षेत्राला भेट देऊन येथे महापालिकेच्या वतीने संरक्षक जाळी बसवण्याचे निर्देश दिले. दरवर्षी याठिकाणी दुर्घटना घडत असल्याने स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे असे संबंधित अधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. दादर येथील महापालिकेच्या सफाई कामगारांची वसाहत असलेल्या कासारवाडीला भेट देऊन बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, अभ्यासिका आणि इथे केलेल्या इतर कामांचाही त्यांनी आढावा घेतला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.