
राज्यातील संरक्षित स्मारकांवर (Protected Monuments) फोटो, व्हिडिओचे आक्षेपार्ह पद्धतीने चित्रीकरण केले जाते. त्यामुळे संरक्षित स्मारकांचा अवमान होतो. या पार्श्वभूमीवर राज्यातील ३८९ संरक्षित स्मारकांवर प्री-वेडिंग शूटिंग, धार्मिक कार्यक्रम, लग्न सोहळे यांना बंदी घातली आहे. जाहिरात, मालिका, चित्रपटांच्या शूटिंगसाठी राज्य पुरातत्त्व वास्तुसंग्रहालये संचालनालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे. (Protected Monuments)
गुन्हा नोंदवला जाणार
मात्र, परवानगी न घेता शूटिंग केल्यास गुन्हा नोंदवला जाणार आहे. त्याचबरोबर १ लाख रुपये दंडदेखील ठोठावला जाणार आहे, अशी माहिती मुंबई येथील राज्य पुरातत्त्व वास्तू संग्रहालये संचालनालयातील सूत्रांनी दिली. दरम्यान, मालिका, चित्रपटांच्या शूटिंगसाठी आता पोर्टल सुरू केले असून पूर्वी परवानगीसाठी ३ महिने लागत होते, आता ही परवानगी ७ दिवसांत मिळणार आहे. (Protected Monuments)
सिंगल विंडो फिल्म सेल पोर्टल
जाहिरात, मालिका आणि चित्रपटांची शूटिंग करायची असल्यास त्याच्या परवानगीसाठी ‘सिंगल विंडो फिल्म सेल पोर्टल’ सुरू केले आहे. या पोर्टलवर जाऊन परवानगीसाठी अर्ज करावा लागेल. पूर्वी ३ महिन्यांआगोदर परवानगीसाठी अर्ज करावा लागायचा. आता मात्र ७ दिवस आगोदर अर्ज केल्यानंतर परवानगी मिळत आहे. १ एप्रिलपासून हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. शूटिंगसाठी आता अनामत रक्कम द्यावी लागणार आहे. यात जाहिरातीसाठी ४० हजार, मालिकेसाठी १ लाख, चित्रपटासाठी २ लाख ५० हजार रुपये अनामत रक्कम जमा करावी लागणार आहे. (Protected Monuments)
रील्सवर कारवाई केली जाणार
सध्या तरुणाई मोबाइलचा वापर करून फोटो, रील्स तयार करतात. परंतु, रील्ससाठी सध्या स्वतंत्र नियमावली तयार केलेली नाही. याबाबतदेखील लवकरच नियमावली तयार केली जाणार आहे. रील्समध्ये काही गैरकृत्य करताना समोर आले तर कारवाई केली जाणार आहे. (Protected Monuments)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community