पावसाळ्याआधी दिलासा! म्हाडाच्या उपकर प्राप्त इमारतींच्या दुरुस्तीला मंजुरी; Mangal Prabhat Lodha यांच्या पाठपुराव्याला यश

42
पावसाळ्याआधी दिलासा! म्हाडाच्या उपकर प्राप्त इमारतींच्या दुरुस्तीला मंजुरी; Mangal Prabhat Lodha यांच्या पाठपुराव्याला यश
  • प्रतिनिधी

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील म्हाडाच्या उपकर प्राप्त इमारतींच्या दुरुस्तीच्या प्रस्तावांना अखेर मंजुरी मिळाली असून, या कामांना आता वेग मिळणार आहे. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निर्णय शक्य झाला आहे.

मंत्री लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्वसन मंडळ (म्हाडा) यांना पत्र लिहून विनंती केली होती की, ७९(ए) नोटीस दिलेल्या उपकर प्राप्त इमारतींच्या दुरुस्तीच्या कामांमध्ये अडथळे येत आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर अशा इमारतींची तातडीने दुरुस्ती होणे आवश्यक आहे, अन्यथा नागरिकांच्या जीवितासह मालमत्तेवरही धोका निर्माण होऊ शकतो, अशी त्यांनी तिव्र भूमिका मांडली होती.

(हेही वाचा – BJP आमदाराकडून शिवसेना नेत्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; थेट मुख्यमंत्र्यांना पत्र)

या पत्राला सकारात्मक प्रतिसाद देत म्हाडा मंडळाने त्वरित निर्णय घेतला आहे. संबंधित प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून, आता मंजूर निधीच्या आधारे दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू होतील. या निर्णयामुळे अनेक जुन्या आणि धोकादायक स्थितीत असलेल्या इमारतींच्या दुरुस्तीस मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित आसरा मिळणार असून, संभाव्य दुर्घटनांचा धोका मोठ्या प्रमाणावर टळणार आहे.

म्हाडाकडून मिळालेल्या माहितीनुसार, उपकर प्राप्त इमारतींसाठी आवश्यक निधी पूर्वीच वितरित करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता फक्त अंमलबजावणीची गरज आहे. पावसाळ्याआधी सुरक्षिततेचा मोठा निर्णय घेण्यात आला असून, मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्या पाठपुराव्यामुळे मुंबईतील उपकर प्राप्त म्हाडा इमारतींच्या दुरुस्तीसाठी प्रशासन पुढे सरसावले आहे. हजारो रहिवाशांना याचा थेट लाभ होणार असून, त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.