Ahmedabad Plane Crash मागील खरे कारण येणार समोर; कारण…

विमान अपघाताची (Ahmedabad Plane Crash) चौकशी तीव्र करण्यात आली आहे. सरकारने चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.

227

अहमदाबाद येथे झालेला विमान अपघात (Ahmedabad Plane Crash) नक्की कोणत्या कारणामुळे झाला, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्व तपास यंत्रणा याचाच शोध घेत आहेत. आता विमानाचा ब्लॅक बॉक्स आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर सापडला आहे. यावरून विमान अपघातामागील खरे कारण समजणार आहे.

अहमदाबादमधील विमान अपघातात (Ahmedabad Plane Crash) आतापर्यंत २९७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. विमानात बसलेल्या २४२ प्रवाशांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला आहे, तर सुदैवाने एक प्रवासी बचावला आहे. मृतांपैकी २२९ प्रवासी होते, तर १२ क्रू मेंबर होते. याशिवाय ज्या मेडिकल कॉलेज-हॉस्टेलवर विमान कोसळले, त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या ५६ जणांनाही आपला जीव गमवावा लागला आहे.

(हेही वाचा Israel Strikes on Iran : युद्ध पेटले; इराणने इस्रायलवर डागले 100 ड्रोन)

दरम्यान, विमान अपघाताची (Ahmedabad Plane Crash) चौकशी तीव्र करण्यात आली आहे. सरकारने चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. अहदमाबाद विमानतळावरुन विमानाने टेकऑफ केल्यानंतर काही सेकंदातच विमान कोसळल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विमानात ऐनवेळी काय तांत्रिक बिघाड झाला? वैमानिकाला विमान नियंत्रणात का आणता आले नाही? अखेरच्या क्षणाला विमानात नेमकी काय परिस्थिती होती? अशा विविध प्रश्नांची उत्तरे शोधली जात आहेत. मात्र आता या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता आहे. कारण ब्लॅक बॉक्स आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर सापडले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.