RBI : एका वर्षात रेकॉर्डब्रेक २५ टन सोन्याची खरेदी, आर्थिक वर्ष २०२४-२५…

भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(RBI)च्या गंगाजळीतील सोने गेल्या चार वर्षांत जवळपास दुप्पट झाले आहे.

51

भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(RBI)च्या गंगाजळीतील सोने गेल्या चार वर्षांत जवळपास दुप्पट झाले आहे. मागील वर्षभरात सोन्याचा भावात मोठी वाढ दिसून आली असून सोने भावाने एक लाखांचा टप्पा ओलांडल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे आरबीआय(RBI)ने एका वर्षात रेकॉर्डब्रेक २५ टन सोन्याची खरेदी केली असून आर्थिक वर्ष २०२४-२५च्या दुसऱ्या सहामाहीत तिजोरीमध्ये जवळपास २५ टन सोन्यात वाढ झाली आहे.

दरम्यान, सोने भाव वधारल्यानंतर अनेक जण सोने खरेदी करण्याकडे पाठ फिरवतात. केंद्र सरकारने आरबीआयच्या गंगाजळीतील सोन्याची आकडेवारी जाहीर केली आहे. देशाची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआय(RBI)ने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये सोने गंगाजळीत ५७ टनांची भर घातली आहे. विशेष सोने भावात २५ टक्क्यांहून अधिक तेजी दिसून आली असून गेल्या सात वर्षांमधील सर्वात मोठी वार्षिक वाढ नोंदविली आहे.

महागाई आणि चलनातील अस्थिरता असताना सोने महत्त्वाची भूमिका बजावत असते. देशातील मध्यवर्ती बँका सोने साठा वाढवून मालमत्ता प्रकारांमध्ये वैविध्य आणण्याचा प्रयत्न करत असतात. जागतिक बाजारपेठेत अस्थिरता आल्याने मागील काही काळात मध्यवर्ती बँकांनी सोने खरेदी वाढविण्यावर भर दिला होता.(RBI)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.