RBI on Unclaimed Deposits : बँकांमधील बेवारस ठेवींचा आढावा घेण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या बँकांना सूचना

बेवारस ठेवींची माहिती लोकांना मिळावी यासाठी रिझर्व्ह बँकेनं ऑगस्ट महिन्यातच एक ऑनलाईन पोर्टलही सुरू केलं आहे. 

151
RBI on Unclaimed Deposits : बँकांमधील बेवारस ठेवींचा आढावा घेण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या बँकांना सूचना
RBI on Unclaimed Deposits : बँकांमधील बेवारस ठेवींचा आढावा घेण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या बँकांना सूचना
  • ऋजुता लुकतुके

बेवारस ठेवींची माहिती लोकांना मिळावी यासाठी रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank) ऑगस्ट महिन्यातच एक ऑनलाईन पोर्टलही सुरू केलं आहे. (RBI on Unclaimed Deposits)

बँकांमध्ये पडून असलेल्या बेवारस ठेवींविषयी नवीन मार्गदर्शक सूचना १ जानेवारीला रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank) जारी केल्या आहेत. त्यानुसार, सर्व प्रकारच्या बँकांना त्यांच्याकडे असलेल्या अशा ठेवींचा नियमित आढावा घेणं आता बंधनकारक असेल. दहा वर्षांपेक्षा जास्त कालावधीत जर एखादी ठेव किंवा खात्यात पैसे ठेवणे किंवा काढणे यातील कुठल्याही प्रकारचा व्यवहार झालेला नसेल तर असं खातं हे वापरात नसलेलं मानलं जातं. आणि अशा ठेवी या बेवारस असतात. (RBI on Unclaimed Deposits)

अशी खाती मग कालांतराने रद्द होतात आणि त्यातील पैसे रिझर्व्ह बँकेकडे (Reserve Bank) जमा केले जातात. रिझर्व्ह बँकेकडून (Reserve Bank) ते पैसे मिळवून खातं पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया जटील आहे. त्यामुळे मूळात खाती बेवारस होऊच नयेत असा रिझर्व्ह बँकेचा प्रयत्न आहे. (RBI on Unclaimed Deposits)

(हेही वाचा – Ultra Jhakaas : ‘ओली की सुकी’ चित्रपट ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर)

या पोर्टलवर मिळणार बेवारस खात्यांची सर्व माहिती

अशा वापरात नसलेल्या खात्यांचा वापर घोटाळे किंवा आर्थिक अफरातफर करण्यासाठीही केला जाऊ शकतो, त्यामुळे बँकांनी जागरुक रहावं, असं रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank) म्हटलं आहे. त्यांनी जारी केलेली मार्गदर्शक तत्त्व ही सरकारी, खाजगी बँका तसंच सहकारी बँकांना लागू होतील. (RBI on Unclaimed Deposits)

यात बेवारस खात्यांचा शोध घेऊन त्यासाठीची नामांकित व्यक्ती किंवा कायदेशीर वारस यांचा शोध बँकांनी घ्यावा असे निर्देश रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank) दिले आहेत. त्याचबरोबर लोकांना खाती बेवारस पडून राहू नयेत यासाठी जागरुक करणारी यंत्रणा उभारणं हे ही बँकांना आता करावं लागेल. (RBI on Unclaimed Deposits)

खुद्द रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank) ऑगस्ट २०२३ मध्ये युडीजीएएम पोर्टल (UDGAM Portal) कार्यान्वित केलं आहे. या पोर्टलवर बेवारस खात्यांची सर्व माहिती देण्यात आली आहे. तुमच्या किंवा तुमच्या जवळच्या नातेवाईकाच्या नावावर असं एखादं खातं आहे का याची माहिती या पोर्टलवर तुम्हाला मिळू शकते. (RBI on Unclaimed Deposits)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.