Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर रवींद्र चव्हाण यांचा चौथा पाहणी दौरा, कधी होणार काम पूर्ण ?

मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका

111
Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर रवींद्र चव्हाण यांचा चौथा पाहणी दौरा, कधी होणार काम पूर्ण ?
Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर रवींद्र चव्हाण यांचा चौथा पाहणी दौरा, कधी होणार काम पूर्ण ?

मुंबई गोवा महामार्गाचे (Mumbai Goa Highway) काम गेली 12 वर्षे रखडले आहे. गणेशोत्सवापूर्वी या रस्त्याच्या एका लेनचे काम पूर्ण व्हावे यासाठी शासनाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अशातच मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. मनसेने याबाबत आक्रमक भूमिका घेतली असून राज्य सरकारविरोधात आंदोलनही केले आहे. त्याकरिता CBT हे नवीन तंत्रज्ञान वापरले जात आहे. दरम्यान या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी २६ ऑगस्टला मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी करून आढावा घेतला.

गणेशोत्सवापूर्वी कॉंक्रीटची एकतरी मार्गिका पुर्ण करू, असा दावा मंत्री चव्हाण यांनी केला आहे. वारंवार दौरे करून ते सरकारी अधिकारी आणि महामार्ग बांधणारे ठेकेदार कंपनी यांच्यावर दबाव ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

(हेही वाचा – Lumpy Skin Disease : राज्यात लम्पीचा उद्रेक, नुकसानभरपाई देण्याविषयी प्रशासनाची भूमिका उदासिन ?)

मनसेचा महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी सरकारवर दबाव

यापूर्वी याच महिन्यात मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दोनवेळा महामार्गाच्या (Mumbai Goa Highway) कामाची पाहणी केली होती. त्यांचा हा चौथा पाहणी दौरा असून मनसेच्या गांधीगिरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चव्हाण यांचा हा दौरा महत्त्वाचा आहे. रविवार, २७ ऑगस्टला अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढण्यात येणार असून संध्याकाळी कोलाड येथे राज ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या होणारी अमित ठाकरे यांची पदयात्रा आणि राज ठाकरे यांची सभा या पार्श्वभूमीवर बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचा आजचा दौरा महत्त्वपूर्ण आहे.

दरम्यान मनसेचे पनवेलचे महानगर अध्यक्ष योगेश चिले यांनी या कामाची पाहणी केली आहे. कॉंक्रीटच्या कामात सळईचा वापर केला जात नाही, तसेच कॉंक्रीटचे आच्छादन टाकल्यावर त्यावर मजूरांकरवीच कॉंक्रीट पसरविण्याचे काम सूरु असल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर योगेश चिले यांनी प्रसारित केली आहे.

पेणजवळ मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

पेणजवळ मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai Goa Highway) मोठी वाहतूक कोंडी झाल्याची माहिती आहे. या कोंडीचा फटका सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनाही बसला असून तब्बल अर्ध्या तासांपासून त्यांचा ताफा वाहतूक कोंडीत अडकून पडला. आज सकाळी त्यांचा ताफा रायगडकडे निघाला असताना मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोडी झाली. त्यांची कार जवळपास अर्धा तास वाहतूक कोंडीत अडकून पडली होती. गेल्या काही दिवसांपासून मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूकीचा मुद्दा आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न सातत्याने समोर येत आहे.

आणि स्वतः मंत्री महोदय रस्त्यावर उतरले…

मुंबई गोवा पाहणी दौरा सुरू असतानाच पेणजवळ हॉटेल साई सहारा जवळ एक एसटी बंद पडल्यामुळे या मार्गावर सुमारे दोन ते अडीच तास वाहतूक कोंडी झाली होती. काही केल्या ही वाहतूक कोंडी सुटेना एसटी जागेवरच बंद पडल्यामुळे दोन्ही बाजूच्या मार्गिकेवरील गाड्या या काही केल्या तब्बल दोन तास हलत नव्हत्या . त्यामुळे जिते येथील ब्रीज पासून वाहतूक कोंडी झाली होती. होटल साई सहारा येथील एसटी जागेवरून काढण्याचे प्रयत्न सुरू होते अखेर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण स्वतः रस्त्यावर उतरले  व ते चालत होटल साई सहारा पर्यंत गेले व त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी या वाहतूक कोंडीतून मार्ग काढला जी एसटी बंद पडली होती ती या एसटीला क्रेनच्या साह्याने बाजूला काढण्यात आले सुमारे दोन तासानंतर हे यश आले त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली  व आता मुंबई गोवा महामार्गावरील पेण जवळील दोन्ही मार्गांवरील वाहतूक अखेर मार्गी लागल्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या व गोवा कडे जाणाऱ्या सर्वच प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.