Ratnagiri: कोकण रेल्वेमार्गावर गुरुवारी ३ तासांचा मेगा ब्लॉक

मडगाव ते कुमठा या भागात दि. १८ एप्रिल रोजी दुपारी १२:१० ते ३ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.

1220
Ratnagiri: कोकण रेल्वेमार्गावर गुरुवारी ३ तासांचा मेगा ब्लॉक

कोकण रेल्वे मार्गावर देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी येत्या गुरुवारी, दि. १८ एप्रिल रोजी तीन तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. या मेगा ब्लॉकचा परिणाम कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दोन विशेष गाड्यांवर होणार आहे. (Ratnagiri)

मडगाव ते कुमठा या भागात दि. १८ एप्रिल रोजी दुपारी १२:१० ते ३ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. या मेगा ब्लॉकमुळे कोकण रेल्वेमार्गावर १८ एप्रिल रोजी प्रवास सुरू होणारी मंगळूर सेंट्रल ते मडगाव (गाडी क्रमांक ०६६०२) ही गाडी मडगावपर्यंत न नेता कारवारपर्यंत धावणार आहे. परतीच्या प्रवासात ही गाडी (क्रमांक ०६६०१) कारवार येथूनच मंगळूरपर्यंत चालवली जाणार आहे. कारवार ते मडगावपर्यंतचा या गाडीचा प्रवास रद्द करण्यात आला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.