Veer Savarkar : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सावरकर

सावरकर मुंबईमध्ये वास्तव्यास असताना डॉ. हेडगेवार सावरकरांना ब-याचदा भेटायला जायचे. ते स्वतः जातीने हिंदु महासभेच्या कार्यामध्ये सहभागी होत. सावरकरांना देखील संघ अस्पृश्य नव्हता.

83
Veer Savarkar : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सावरकर
Veer Savarkar : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सावरकर

जयेश शत्रुघ्न मेस्त्री

बरेच विश्लेषक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सावरकर यांच्या विचारांची मांडणी करताना दोन्ही तत्त्व परस्परविरोधी आहेत असं मानतात. (Veer Savarkar) हिंदू महासभा आणि संघातील वाद दाखवून देतात. खरं सांगायचं तर संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार आणि सावरकरांचे संबंध जिव्हाळ्याचे होते. सावरकर मुंबईमध्ये वास्तव्यास असताना डॉ. हेडगेवार सावरकरांना ब-याचदा भेटायला जायचे. ते स्वतः जातीने हिंदु महासभेच्या कार्यामध्ये सहभागी होत. सावरकरांना देखील संघ अस्पृश्य नव्हता. सावरकर हिंदु महासभेच्या दौ-यावर असताना अनेक ठिकाणी संघाच्या शाखांचे उद्घाटन करायचे. संघाचे प्रचारक दादा परमार्थ हे सावरकरांसोबत दौ-यावर असायचे. अशी आठवण विश्वास सावरकरांनी सांगून ठेवली आहे. (Veer Savarkar)

(हेही वाचा – India vs England : भारताची भिस्त आता गोलंदाजांवर; इंग्लंडसमोर २३० धावांचे आव्हान )

विश्वास सावरकर लिहितात, ‘दस-याच्या विशेष समारंभावेळी तात्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बौद्धिक दिले होते व संचलनात मानवंदना स्वीकारली होती. स्वतः मी स्वयंसेवक म्हणून १९४१ पर्यंत संघस्थानावर जात असे. माझे काका डॉ. सावरकर हे तर १९३८ – ३९ मध्ये संघाचे प्रांतिक अधिकारी होते. तेव्हा हिंदुसभा व संघाचे ध्येय एकच असल्याने कामंही हातात हात घालून होई.’ पुढे गांधी हत्येनंतर संघ आणि महासभेचे संबंध बिघडल्याचे दिसून येते. मात्र त्यामुळे संघ हा सावरकरांपासून वेगळा आहे, अशी मांडणी करण्याची मुळीच गरज नाही. (Veer Savarkar)

हिंदूंमधील अनेक लोक वेगवेगळ्या अध्यात्मिक संप्रदायात जातात. त्यांची वेगवेगळी उपासना पद्धती असते. त्या-त्या संप्रदायांमध्ये तात्त्विक वादही असतात. पण हिंदू म्हणून आपण जेव्हा विचार करतो तेव्हा संप्रदायाच्या भिंती पाडून टाकाव्या लागतात. स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंसांचे शिष्य होते. पण अमेरिकेत गेल्यावर त्यांनी केवळ रामकृष्णांची शिकवण सांगितली नाही. स्वामीजींनी हिंदु धर्माची शिकवण सांगितली. राजकीय हिंदुत्वाचा विचार करता, ही शिकवण आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली आहे. सावरकरांनी त्याचे एका सिद्धांतामध्ये रूपांतर केले. हिंदुत्वाचा गौरव सांगताना सावरकर तर प्रभु श्रीरामचंद्रांपासून सुरुवात करतात. (Veer Savarkar)

संघ आणि हिंदू महासभा या दोन वेगळ्या संस्था आहेत. आजच्या घडीला महासभेचा प्रवास पाहता, ते केवळ संघविरोधी आहेत की, हिंदुत्वाच्या शत्रूंसोबत आहेत हेच कळायला मार्ग नाही, असो. हा आपल्या लेखाचा विषय नाही. मला वाटतं की, संघाने त्या काळी जो सावध निर्णय घेतला त्यामुळेच आज सावरकरांच्या संकल्पनेतील हिंदुत्वाचे राजकारण आकाराला येत आहे. चार पावले मागे घेतल्याने ४०० पावले पुढे जाता येते आणि हेच संघाने केल्याचे दिसून येते. (Veer Savarkar)

छत्रपती शिवाजी महाराजांनी जी परंपरा सुरु केली त्यास सावरकरांनी व्याख्या दिली, तत्त्वज्ञानाची जोड दिली, सिद्धांत मांडला. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही छत्रपतींच्या वैचारिक परंपरेतली एक संस्था आहे. आज संघासह अनेक हिंदु जन व संस्था ज्या हिंदुत्व या शब्दाचा अभिमानाने उच्चार करतात. त्यास सावरकरांनी पुनरुज्जीवित केले आहे व एका व्याख्येच्या साच्यात बसवले आहे. म्हणूनच प्रत्येक हिंदुचे व हिंदू संस्थांचे सावरकरांशी नाते आहे. याच तर्कानुसार संघ आणि सावरकर वेगळे नाहीत. तात्विक वाद नक्कीच असतील; पण चूल एकच आहे. (Veer Savarkar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.