गुजरातमधील अहमदाबाद येथे १२ जून रोजी लंडनला निघालेले एअर इंडियाचे AI १७१ हे विमान कोसळले. या अपघातात (Ahmedabad Plane Crash) विमानातील २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला असून केवळ एकच व्यक्ती बचावली आहे. रमेश विश्वास असे या व्यक्तीचे नाव आहे. रमेश यांचा एक नवा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या भीषण अपघानंतरच्या (Ahmedabad Plane Crash) आगीच्या ज्वाळांमधून आणि धुरांच्या लोटांमधून ते हातात मोबाईल घेऊन बाहेर आले होते. सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या १७ सेकेंदांच्या व्हिडिओमध्ये ते बाहेर येताना दिसत आहेत.
અવિશ્વસનીય પરંતુ સત્ય!
અમદાવાદ પ્લેન ક્રેશમાં ચમત્કારિક રીતે બચેલા રમેશ વિશ્વાસનો વધુ એક વિડિઓ સામે આવ્યો.
દુર્ઘટના થયા પછી હાથમાં ફોન સાથે ચાલીને બહાર નીકળ્યો રમેશ વિશ્વાસ. #AhmedabadPlaneCrash pic.twitter.com/94WDepkKjn
— Sagar Patoliya (@kathiyawadiii) June 16, 2025
रमेश विश्वास जेव्हा आगीतून बाहेर येत होते, तेव्हा सभोवताली एकच गोंधळ आणि आरडाओरड सुरू होती. एअर इंडियाच्या अहमदाबाद-लंडन गॅगविक फ्लाइटमध्ये रमेश विश्वास हे ११ क्रमांकाच्या सीटवर बसले होते. या हल्ल्यात पायलट आणि क्रू मेंबर्ससह एकूण २४१ जणांचा मृत्यू झाला. यात २३० प्रवासी होते. यांपैकी केवळ रमेश विश्वास हेच जिवंत वाचू शकले. या विमान अपघातानंतर (Ahmedabad Plane Crash), शुक्रवारी नरेंद्र मोदी यांनी सिव्हिल रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली होती. यावेळी अपघातातून बचावलेल्या रमेश विश्वासकुमार याचीही भेट झाली होती. यावेळी रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नेमके काय घडले? आपण कसे बचावलो यासंदर्भात माहिती दिली.
(हेही वाचानवीन पनवेलच्या नागरिकांना सतावतेय Kundamala Bridge Collapse सारखी दुर्घटना घडण्याची भीती)
सगळे माझ्या डोळ्यांसमोर झाले. मला स्वतःला विश्वास बसत नाही की, मी त्यातून जिवंत कसा बाहेर आलो. कारण थोड्यावेळासाठी माझाही मृत्यू होणार, असेच वाटत होते. पण मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा मला समजले की मी जिवंत आहे. मी सीटबेल्ट काढला आणि तिथून बाहेर पडलो. माझ्यासमोरच एअरहोस्टेसचा आणि बाकीच्या लोकांचे मृतदेह पडले होते. दरवाजा तुटलेला होता आणि मला समोर रिकामी जागा दिसली. टेकऑफ नंतर विमानाचा वेग वाढवताच, काहीतरी विचित्र वाटले. अचानक ५-१० सेकंदांसाठी सर्व काही थांबल्यासारखे वाटले. नंतर अचानक विमानात हिरवे आणि पांढरे लाईट सुरु झाले. असे वाटत होते की जणू काही पायलटने उड्डाणासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे. मग ते थेट होस्टलच्या इमारतीत घुसले (Ahmedabad Plane Crash). विमानाचा ज्या भागात माझी सीट होती तो भाग इमारतीच्या खालच्या भागाला धडकला असावा. वरच्या भागात आग लागली होती, तिथे बरेच लोक अडकले होते. कदाचित मी सीटसह खाली पडलो. मी कसा तरी बाहेर पडण्यात यशस्वी झालो. दरवाजा तुटलेला होता आणि मला समोर काही रिकामी जागा दिसली, म्हणून मी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, असे विश्वासकुमारने सांगितले.
Join Our WhatsApp Community