Rajasthan : राजस्थानच्या 4 हजार पेट्रोलपंप मालकांचा संप; ‘ही’ आहे मागणी

Rajasthan : 12 मार्च रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत संप सुरू रहाणार आहे. आपत्कालीन सेवेतील वाहनांशिवाय कोणत्याही वाहनात डिझेल आणि पेट्रोल भरले जात नाही.

156
Rajasthan : राजस्थानच्या 4 हजार पेट्रोलपंप मालकांचा संप; 'ही' आहे मागणी
Rajasthan : राजस्थानच्या 4 हजार पेट्रोलपंप मालकांचा संप; 'ही' आहे मागणी

राजस्थानमध्ये १० मार्च रोजी तब्बल ४ हजार पेट्रोलपंप मालक संपावर गेले आहेत. (Petrol pump strike) त्यामुळे सकाळी ६ वाजल्यापासून बंद आहेत. पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट (मूल्यवर्धित कर) दर कमी करण्याच्या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. 12 मार्च रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत संप सुरू रहाणार आहे. आपत्कालीन सेवेतील वाहनांशिवाय कोणत्याही वाहनात डिझेल आणि पेट्रोल भरले जात नाही. (Rajasthan)

(हेही वाचा – Ajit Pawar-Supriya Sule : अजित पवार-सुप्रिया सुळे एकाच कार्यक्रमात समोरासमोर; व्यासपिठावरच झाला सवाल-जवाब)

सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये संपाचा परिणाम 

काही जिल्ह्यांत कडकडीत बंद पाळण्यात आला आहे, तर जोधपूर, कोटा, भिलवाडा, अजमेर, जैसलमेर येथे पेट्रोलपंप सुरू आहेत. त्याचवेळी सीकरमध्ये एकच दिवस संप सुरू आहे. जयपूरसह आंतरराज्य सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये संपाचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. येथून लोक पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी यूपी, हरियाणा येथे जात आहेत.

पेट्रोलवर 31.04 टक्के व्हॅट

राजस्थानमध्ये पेट्रोलवर 31.04 टक्के व्हॅट आहे. त्याचप्रमाणे डिझेलवर 19.30 टक्के व्हॅट आहे. शेजारील राज्यात डिझेल आणि पेट्रोल स्वस्तात विकले जात आहे. त्याचा सर्वाधिक फटका हरियाणा आणि गुजरातच्या सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यांना बसला आहे. व्हॅट कमी झाल्यामुळे बहुतांश वाहनांमध्ये डिझेल आणि पेट्रोल इतर राज्यांतून भरले जात आहे. अशा स्थितीत स्थानिक पंपाचे मोठे नुकसान होत आहे. या कारणाने हा संप पुकारण्यात आला आहे.

राज्यभरातील पेट्रोल पंप चालक 11 मार्च रोजी जयपूर येथील सचिवालयाला घेराव घालणार आहेत. वाढीव व्हॅटमुळे पेट्रोल पंपचालकांचे सातत्याने नुकसान होत आहे. गेल्या 7 वर्षांपासून डीलर्सचे कमिशन वाढवलेले नाही. त्यामुळे राजस्थानमधील बहुतांश पेट्रोल पंप बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. (Rajasthan)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.