Rain Alert : येत्या २ दिवसांत बहुतेक राज्यांत पावसाची शक्यता

Rain Alert : १४ मे पर्यंत महाराष्ट्रात वादळीवारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगड, प. बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू व सिक्कीममध्येही पावसाची शक्यता आहे.

64

यंदाच्या वर्षी मान्सून १७ वर्षानंतर म्हणजेच २००८ पासून प्रथमच मान्सून (Monsoon) नियोजित कालावधीच्या चार दिवस आधी केरळमध्ये पोहोचणार आहे. यंदा मान्सून २७ मे २०२५ पर्यंत केरळ किनाऱ्यावर पोहोचणार आहे. सध्या मान्सून निकोबार बेटे, दक्षिण अंदमान समुद्र, पूर्व बंगाल उपसागराच्या काही भागांत पोहोचला आहे. (Rain Alert)

(हेही वाचा – India Pakistan War : पाकिस्तानचे ‘गिरे तो भी टांग उपर’; सरकारी वृत्तवाहिनी म्हणते, आमच्यामुळे दिल्ली, राजस्थानमध्ये अंदाधुंदी)

नैऋत्य मोसमी वारे माले, पूर्व बंगाल उपसागर, निकोबार बेट व मध्य अंदमान समुद्रातून जातो. (Weather Update) १५ किंवा १६ मे पर्यंत मान्सून वेगाने पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर तो दक्षिण अरबी समुद्रात प्रवेश करेल आणि श्रीलंकेचा काही भाग, दक्षिण बंगाल उपसागराचा काही भाग आणि संपूर्ण अंदमान बेटे व्यापेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. पुढील २ दिवसांत बहुतेक राज्यांत पावसाची शक्यता आहे. १४ मे पर्यंत महाराष्ट्रात वादळीवारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगड, प. बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू व सिक्कीममध्येही पावसाची शक्यता आहे.

यंदाचा मान्सून १५ मे रोजी अंदमान आणि निकोबार (Andaman and Nicobar) या ठिकाणी येईल. १ जून रोजी केरळ, तामिळनाडू, लक्षद्वीप, आसाम, मेघालय. ५ जून रोजी गोवा, आंध्र प्रदेश किनारपट्टी, कर्नाटक, पश्चिम बंगाल. ६ जून रोजी महाराष्ट्र, आंध्र प्रदेशचे किनारपट्टी व्यतिरिक्त जिल्हे.

१० जून रोजी मध्य महाराष्ट्र (Maharashtra), मुंबई, तेलंगणा, छत्तीसगड, ओडिसा, झारखंड, बिहार. १५ जून रोजी गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश. तर २० जून रोजी गुजरात, राजस्थान, उत्तराखंड, दिल्ली. २५ जून रोजी राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश तर ३० जून रोजी राजस्थान, नवी दिल्ली या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. (Rain Alert)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.