Weather Update : पुढील तीन दिवस पावसाचा अलर्ट; वाचा हवामान विभागाचा अंदाज

176

राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी मुंबई, पुण्यासह काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. (Rain Alert) मुंबईला मंगळवार आणि बुधवारसाठी ‘यलो ॲलर्ट’ जारी करण्यात आला आहे. ठाणे आणि मुंबईमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Weather Update) दक्षिण कोकणामध्येही ‘यलो ॲलर्ट’ देण्यात आला आहे. अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांच्या घाट परिसरात पावसाचा ॲलर्ट देण्यात आला आहे.

(हेही वाचा – India-Pakistan War : जिहाद करणे हे पाकिस्तानी सैन्याचे कामच आहे; अहमद शरीफ यांचा व्हिडिओ व्हायरल)

नैऋत्य मोसमी पाऊस (Southwest Monsoon) मंगळवारी अंदमान – निकोबार बेटांवर दाखल होण्याची शक्यता आहे. त्या भागात जोरदार पाऊस सुरू झाला असून पुढील चोवीस तासांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पुढील चार-पाच दिवसांत मान्सून (Monsoon) बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रातही येईल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. चोवीस तासांत निकोबार बेटांवर काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. त्यामुळे त्या ठिकाणी अवघ्या काही तासांत मान्सून दाखल होण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने सोमवारी दिला.

राज्यातील कोकण-गोवा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण-गोव्यात मंगळवार, 13 आणि बुधवार, 14 मे या दिवशी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. पुणे आणि घाट विभाग, कोल्हापूर आणि घाट विभाग, सातारा, सांगली, बीड, धाराशीव येथे तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ‘ऑरेंज’ अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे.

पुण्यात चार दिवस ‘यलो’ अलर्ट

पुणे शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे, तर पुढील चार दिवसांत कमाल तापमानामध्ये घट आहे. त्यामुळे पुणे शहराला पुढील चार दिवस ‘यलो’ अलर्ट देण्यात आला आहे. (Weather Update)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.