किल्ले रायगड (Raigad Rain) महामार्गावरील कोंझर घाटात असलेल्या धबधब्यातील येणाऱ्या मुसळधार पाण्याने नव्यानं बांधण्यात आलेल्या मोरीच्या परिसरातील बायपास मार्ग खचला आहे. परिणामी या मार्गावरील वाहतूक पोलीस प्रशासनाकडून बंद करण्यात आली आहे. (Raigad Rain)
किल्ले रायगड परिसरात देखील ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तविलेलया अंदाजानुसार आज रायगडमध्ये सकाळपासून मुसळधार पावसाची रिपरिप सुरू आहे. रायगडच्या श्रीवर्धन तालुक्याला पावसाने अक्षरक्ष: झोडपले आहे. या जोरदार पावसामुळे श्रीवर्धन तालुक्यातील वाळवटी गावात पाणीच पाणी झाले आहे. (Raigad Rain)
रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असून खोपोली, म्हसळा, महाड, माथेरान, अलिबाग, रोहा तालुक्यासह इतर भागात देखील ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळत असल्याने अनेक भागात रस्त्यावर वृक्ष कोलमडून पडले आहेत. (Raigad Rain)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community