Raigad Fort Update: पर्यटकांनो लक्ष द्या! किल्ले रायगडावरील पायरी मार्ग मेच्या ‘या’ दिवशी राहणार बंद

94
Raigad Fort Update : किल्‍ले रायगडावर ६ जून रोजी तारखेनुसार शिवराज्‍याभिषेक सोहळा (Raigad Shivrajyabhishek Ceremony 2025) होणार आहे. तर तिथीनुसार ९ जून रोजी राज्‍याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी राज्‍यासह देशभरातून शिवभक्‍त मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. त्‍या पार्श्वभूमीवर शिवभक्‍तांच्या सुरक्षिततेसाठी रायगड किल्‍ल्‍याच्या उंच कड्यावरील मोकळे दगड खाली घेण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. त्‍यासाठी २८ आणि २९ मे रोजी गडाचा पायरी मार्ग बंद ठेवण्याचे आदेश जिल्‍हाधिकारी किशन जावळे (Dist. Collector Kishan Javale) यांनी काढले आहेत. (Raigad Fort Update)

(हेही वाचा – Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्ताने शौर्य, विज्ञान आणि स्मृतिचिन्ह पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन)

शिवभक्‍तांच्या सुरक्षिततेसाठी रायगड किल्‍ल्‍याच्या उंच कड्यावरील मोकळे दगड खाली घेण्याची मोहीम २८ व २९ मे रोजी राबविण्यात येणार असल्याने या दोन दिवशी पायरी मार्गाने गड चढून जाण्यासाठी मनाई करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. हे दगड प्रशिक्षित रेपलरच्या मदतीने काढण्यात येणार आहेत. या कामासाठी दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई (Durgveer Foundation Mumbai) यांनी सहमती दर्शवली आहे. सदर राज्याभिषेक सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती राहणार असल्याने गर्दी व्यवस्थापनाच्या अनुषंगाने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
यासंदर्भात कार्यकारी अभियंता विशेष पथक रायगड किल्ला महाड प्रतिष्ठान मुंबई यांनी सदर दोन दिवशी योग्य ती खबरदारी घेऊन मोकळे दगड हटवण्याचे काम पूर्ण करावे. तसेच याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक रायगड यांनी चित्तदरवाजा, नाणे दरवाजा, गडावरील शिरकाई मंदिर, होळीचा माळ व इतर आवश्यक ठिकाणी पायी मार्गावरील जाण्याच्या प्रवेशद्वारावर आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात करून हा मार्ग पायी वाटचालीसाठी बंद ठेवावा, मात्र या कालावधीत रायगड रोपेची सुविधा सुरू राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

(हेही वाचा – Pakistan चे माणुसकीहीन वर्तन; खराब हवामानामुळे बिघडलेल्या इंडिगोच्या विमानाला इमर्जन्सी लँडिंगसाठी परवानगी नाकारली )

आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या प्राप्त अधिकारानुसार दिनांक २८ व २९ या दोन दिवशी गडावरील पायी वाटचालीचा मार्ग बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी लेखी आदेशानुसार दिले आहेत. २०२३ यावर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आलेल्या एका शिवभक्ताचा महादरवाज्याच्या खालील बाजूस असलेल्या उंच कड्यावरून पडलेल्या दगडामुळे मृत्यू झाला होता. ही गंभीर घटना लक्षात घेऊन चालू वर्षी राज्याभिषेक सोहळ्याच्या अगोदर सदर ठिकाणाहून उंच कड्यावरील मोकळे दगड काढण्यात येणार आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.