Rahul Pandey यांनी घेतली मुख्य माहिती आयुक्तपदाची शपथ

65
Rahul Pandey यांनी घेतली मुख्य माहिती आयुक्तपदाची शपथ
  • प्रतिनिधी

राज्याचे नवनियुक्त मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे (Rahul Pandey) यांनी सोमवारी राजभवन येथे आपल्या पदाची शपथ घेतली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी पांडे यांना शपथ दिली. याचवेळी रवींद्र ठाकरे, प्रकाश इंदलकर आणि गजानन निमदेव यांनीही राज्य माहिती आयुक्तपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा शपथविधी समारंभ संपन्न झाला.

(हेही वाचा – Murshidabad मध्ये धर्मांध मुसलमानांनी हिंदू महिलांना बलात्काराची धमकी देत धर्मांतरासाठी केली जबरदस्ती)

समारंभाची सुरुवात राष्ट्रगीत आणि राज्यगीताने झाली. राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे (Rahul Pandey) तसेच इतर माहिती आयुक्तांच्या नियुक्तीची अधिसूचना वाचून दाखवली. त्यानंतर शपथविधी पार पडला आणि समारोप पुन्हा राष्ट्रगीताने झाला. या छोटेखानी समारंभाला विधान परिषद सदस्य परिणय फुके, मुख्य सचिव सुजाता सौनिक, प्रधान सचिव तसेच माहिती आणि जनसंपर्क महासंचालक ब्रिजेश सिंह, पत्रकार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

(हेही वाचा – Gutkha Seized: गुटखा वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले; कर्नाटकात २.६० कोटींच्या मुद्देमालसह ११ ट्रक जप्त )

राहुल पांडे (Rahul Pandey) यांच्या नेतृत्वाखाली माहिती अधिकार कायद्याची (आरटीआय) अंमलबजावणी अधिक प्रभावी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. माहिती आयुक्तांच्या नियुक्तीमुळे प्रशासकीय पारदर्शकता आणि जबाबदारी वाढण्यास मदत होईल, असे मानले जात आहे. या शपथविधीमुळे राज्यातील माहिती आयोगाच्या कामकाजाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.