-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईत शेअर रिक्षा (Share Rickshaw) आणि टॅक्सींची ठिकाणे आता वाढू लागली असून विविध राजकीय पक्षांच्या संघटनांच्या माध्यमातून या शेअर रिक्षा आणि टॅक्सीची स्टँड चालवली जात आहे. मात्र, अंधेरी पूर्व येथील आगरकर चौकातून कार्गो आणि एअरपोर्ट येथे जाणाऱ्या शेअर रिक्षासाठी चक्क रस्त्याच्या मधोमधच रांगा लावल्या जात आहे. पदपथाच्या शेजारी खासगी वाहने उभी केली जातात आणि त्यामुळे यासाठी रस्त्याच्या मधोमध रांगा लावून चक्क रस्ताच अडवला जातो. त्यामुळे बऱ्याचदा बेस्ट बसेससह खासगी वाहनांना धिम्या गतीने जावे लागत असल्याने याठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
अंधेरी पूर्व रेल्वे स्थानक मार्ग असलेल्या सहार रोडवरील स्कायवॉक खालील परिसरात अंधेरी पूर्व ते सहार एअरपोर्ट आणि अंधेरी पूर्व ते कार्गो तसेच अन्य ठिकाणी जाण्यासाठी शेअर रिक्षा स्टँड आहेत. ही स्टँड शिवसेना उबाठाच्या साहेब कामगार सेनेच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे. तसेच अंधेरी ते गरवारे आणि अंधेरी आगरकर चौक ते चकाला सिगारेट फॅक्टरी आदी शेअर रिक्षा (Share Rickshaw) टॅक्सी स्टँड हे महाराष्ट्र रिक्षा चालक सेना यांच्या अधिपत्याखाली आहे. या सर्व शेअर रिक्षासाठी सहार मार्गच अडवला जातो.
(हेही वाचा – Shivaji Park परिसराची पारंपारिक पद्धतीने स्वच्छता; यांत्रिक झाडूने का केली जात नाही झाडलोट?)
या सहार मार्गाच्या पदपथाच्या शेजारी खासगी वाहने उभी राहतात तसेच काही रिक्षा उभ्या असतात. त्यामुळे शेअर रिक्षाच्या (Share Rickshaw) प्रतिक्षेत असणारे प्रवाशी हे बसची सुविधा वेळेवर नसल्याने तसेच भरुन जात असल्याने शेअर रिक्षाचा पर्याय निवडतात. त्यामुळे बसच्या तुलनेत शेअर रिक्षालाच अधिक प्राधान्य असून यासाठी सर्व प्रवाशी हे रस्त्याच्या मधोमधच रांगा लावून उभे असल्याचे चि दिसून येत आहे. या सहार मार्गावर प्रवाशी मध्येच उभे राहत असल्याने बेस्ट बसेससह इतर वाहनांना संथ गतीने वाहने पुढे न्यावी लागतात. परिणामी आगरकर चौकावरून सहार मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण होते. तसेच बऱ्याचदा वाहनांमुळे रांगेत उभे असलेल्या प्रवाशांना दुखापत होण्याची दाट शक्यता असते. ही रांग मधोमध रस्त्यावर असल्याने यात वाहन चालकांचा दोष नसला तरी भविष्यात अशाप्रकारची काही घटना घडली याला चालकाला जबाबदार धरले जावू शकते. त्यामुळे शेअर रिक्षा प्रवासासाठी रस्ते अडवला जावून वाहतूक पोलिसांचे कुठलेली लक्ष दिसून येत नाही.
शेअर टॅक्सी आणि रिक्षा स्टँड कुणाचे?
बेस्ट बसचे भाडे पाच आणि सहा रुपयांवरून वाढवून याचे भाडे दुप्पट केल्याने काही प्रमाणात राजकीय पक्षांकडून विरोधाची निशाणी फडकावली जात आहेत. मुंबईत अशाप्रकारची विविध ठिकाणी शेअर रिक्षा (Share Rickshaw) आणि टॅक्सी स्टँड राजकीय पक्षांच्या असून शेअर रिक्षा आणि टँक्सीचे भाडे वाढवल्यानंतर शांत बसणारे राजकीय पक्ष आता बेस्टने भाडे वाढवले असले तरी शेअर रिक्षा आणि टॅक्सीपेक्षोही कमी भाडे आकारल्यानंतर विरोध करताना दिसत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community