Pune: पुण्यातील कोंढवा, कात्रज, बिबवेवाडी परिसरातील पाणीपुरवठा बुधवारी बंद

157
Pune: पुण्यातील कोंढवा, कात्रज, बिबवेवाडी परिसरातील पाणीपुरवठा बुधवारी बंद
Pune: पुण्यातील कोंढवा, कात्रज, बिबवेवाडी परिसरातील पाणीपुरवठा बुधवारी बंद

कात्रज-कोंढवा रस्त्यावर (Pune) कान्हा हॉटेल येथे जलवाहिनी दुरुस्ती व स्थलांतरित करणे, बिबवेवाडी येथे महेश सोसायटी चौकात जलवाहिनी स्थलांतरित करण्याच्या कामासाठी बुधवारी (ता. ६) दक्षिण पुण्यातील कोंढवा, इस्कॉन मंदिर, कात्रज, बिबवेवाडी परिसरातील पाणीपुरवठा बंद असणार आहे. शुक्रवारी (७ मार्च) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग पुढीलप्रमाणे : कोंढवा बुद्रुक, अपर इंदिरानगर परिसर, साईनगर, गजानन नगर, काकडे वस्ती, ग्रीन पार्क, राजीव गांधीनगर, सुपर इंदिरानगरचा काही भाग, इस्कॉन मंदिर परिसर, कोंढवा बुद्रुक गाव, लक्ष्मीनगर, हगवणे वस्ती, अजमेरा पार्क, अश्रफनगर, शांतिनगर, साळवे गार्डन परिसर, श्रेयसनगर, अंबिकानगर, पवननगर, तुळजाभवानी नगर, सरगमनगर, गोकुळनगर, सोमनाथनगर, शिवशंभोनगर, सावकाशनगर, गुलमोहर कॉलनी, अण्णा भाऊ साठेनगर, अपर डेपो परिसर, महानंदा सोसायटी, गुरुकृपा कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, श्रीकुंजनगर, तळजाई झोनमधील पुण्याईनगर, बालाजीनगर पार्ट, शंकर महाराज मठ परिसर, अपर व लोअर इंदिरानगर, महेश सोसायटी परिसर, मानस सोसायटी परिसर, पद्मकुंज, राजयोग सोसायटी, लोकेश सोसायटी, शिवशंकर सोसायटी, कुंभार वस्ती.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.