पुणे रेल्वे स्थानक व पुणे डिझेल लोको शेड येथे Mock Drill आयोजन

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना Mock Drillचे आयोजनाचे आदेश दिले. पुणे रेल्वे स्थानक व पुणे डिझेल लोको शेड येथे मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले.

54

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना Mock Drillचे आयोजनाचे आदेश दिले. पुणे रेल्वे स्थानक व पुणे डिझेल लोको शेड येथे मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले. आपत्कालीन परिस्थितींमध्ये सज्जता वाढविणे व संकटाच्या प्रसंगी प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने पुणे रेल्वे स्थानकावर आरपीएफ व जीआरपी यांच्यामार्फत संयुक्त Mock Drill करण्यात आले.

(हेही वाचा Rohit Sharmaचा कसोटी क्रिकेटला अलविदा, एकदिवसीय टीमच्या कर्णधारपदी कायम )

दरम्यान, या ड्रिलमध्ये आपत्कालीन परिस्थितींचे अनुकरण करून, जखमी, वृद्ध, महिला व लहान मुलांना असुरक्षित ठिकाणाहून सुरक्षित स्थळी हलविण्याचा सराव करून कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले. कुठलीही बेवारस वस्तू किंवा संशयास्पद व्यक्ती दिसल्यास, जवळच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना तात्काळ माहिती द्यावी, अशी माहिती जनजागृतीसाठी प्रवाशांना देण्यात आली.

पुणे रेल्वे स्थानकात आयोजित मॉक ड्रिलमध्ये वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त प्रियांका शर्मा उपस्थित होत्या. आरपीएफकडून एक निरीक्षक, एक उपनिरीक्षक, पाच सहाय्यक उपनिरीक्षक, १५ कर्मचारी, श्वान पथकासह शोध श्वान, १० एमएसएफ कर्मचारी, IPF/CIB कर्मचारी, तर जीआरपीकडून एक निरीक्षक, तीन पीएसआय व ४० कर्मचारी सहभागी झाले. याशिवाय बीडीडीएसचे ०४ कर्मचारी व श्वान, रूबी हॉल क्लिनिकचे वैद्यकीय कर्मचारी व स्थानिक वाहतूक पोलीसही उपस्थित होते.(Mock Drill)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.