Pune: प्रसिद्ध ‘पुना गेस्ट हाऊस’ला मिळाला टपाल तिकिटावर झळकण्याचा बहुमान

टपाल विभागाच्या उपक्रमाचे कौतुक संचालक किशोर सरपोतदार यांनी केले.

182
Pune: प्रसिद्ध 'पुना गेस्ट हाऊस'ला मिळाला टपाल तिकिटावर झळकण्याचा बहुमान
Pune: प्रसिद्ध 'पुना गेस्ट हाऊस'ला मिळाला टपाल तिकिटावर झळकण्याचा बहुमान

पुणेकरांना (Pune) अस्सल मराठमोळे भोजन देण्यामध्ये अविरतपणे कार्यरत आणि उतारवयातील कलाकारांची आपुलकीने सेवा देणारे गेल्या नऊ दशकांपासून आश्रयस्थान असलेल्या लक्ष्मी रस्त्यावरील ‘पूना गेस्ट हाऊस’ला आता टपाल तिकिटावर झळकण्याचा बहुमान मिळाला आहे.

असा बहुमान प्रथमच एका आदरातिथ्य क्षेत्रातील संस्थेला मिळाला आहे. टपाल विभागातर्फे बालगंधर्व कलादालनात भरवण्यात आलेल्या पुणेपेक्स प्रदर्शनामध्ये पुना गेस्ट हाऊसचं छायाचित्र असलेल्या टपाल तिकिटाचे अनावरण गुरुवारी करण्यात आले.

(हेही वाचा – Side Effects of Cold Drinks : दररोज कोल्ड ड्रिंक पिता का ?; सावधान… )

पूना गेस्ट हाऊसचे संचालक किशोर सरपोतदार, अभय सरपोतदार, साधना सरपोतदार आणि शर्मिला सरपोतदार उपस्थित होत्या. मूकपटाचे निर्माते नानासाहेब सरपोतदार यांनी १९३५ मध्ये स्थापन केलेल्या पूना गेस्ट हाऊसच्या माध्यमातून सरपोतदार कुटुंबाची चौथी पिढी कार्यरत आहे. टपाल विभागाच्या उपक्रमाचे कृतज्ञतापूर्वक कौतुक संचालक किशोर सरपोतदार यांनी केले. त्यावेळी ते म्हणाले की, इंटरनॅशल कलेक्टर ऑफ रेअर सोसायटीचे बहुमोल सहकार्य या कामी लाभले आहे. पुना गेस्ट हाऊसचे छायाचित्र टपाल पाकिटावर प्रसिद्ध केल्यामुळे आमची ओळख देशाच्या कानाकोपऱ्यात तसेच जगाच्या पाठीवर होणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.