Pune Porsche Accident : रक्ताचे नमुने बदलणाऱ्या ससूनमधील डॉक्टरांचा परवाना रद्द

35

पुणे पोर्शे अपघात प्रकरणात (Porsche Accident Case) रक्ताचे नमुने बदलणाऱ्या दोन डॉक्टरांवर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (Maharashtra Medical Council) मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील अंतिम निर्णय येईपर्यंत डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरि हळनोर यांचा वैद्यकीय परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या वर्षी मे महिन्यात पुण्यातील कल्याणीनगरमध्ये एक अपघात झाला होता.

(हेही वाचा – Waqf Amendment Bill : वक्फ बोर्डात गैर मुसलमान सदस्य का घेतले ? जेपीसी सदस्याने दिले उत्तर…)

दारूच्या नशेत असलेल्या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने गाडी चालवली आणि दोघांचा जीव घेतला होता. या प्रकरणात आरोपी बड्या बापाचा पोरगा होता. त्यामुळे ससून रुग्णालयात डॉक्टरांना पैसे देऊन त्याच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. या प्रकरणात मुलाच्या रक्ताच्या ठिकाणी आईच्या रक्ताचे सॅम्पल बदलण्यात आले होते. डॉ. अजय तावरे (Dr. Ajay Taware) आणि डॉ. श्रीहरि हाळनोर (Dr. Srihari Halnor) यांच्यावर रक्ताचे नमुने बदलल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यांचा वैद्यकीय परवाना रद्द करावा, अशी मागणी पुणे पोलिसांनी केली होती. आता त्यांच्यावर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने कारवाई केली आहे.

Porsche Accident Case : पुणे पोर्शे अपघात प्रकरण काय?

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये (Kalyaninagar) १९ मे २०२४ च्या मध्यरात्री पबमधून पार्टी करून परत जात असताना अल्पवयीन कार चालकाने भरधाव वेगात कार चालवत एका दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली होती. या अपघातात दुचाकीवरील तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता. हे प्रकरण त्या वेळी बरेच गाजले. या अपघातास कारणीभूत असलेल्या बड्या बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा बराच प्रयत्न झाला. या प्रकरणात पोलिसांनी तीन वेगवेगळे गुन्हे दाखल केले. (Pune Porsche Accident)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.