Dombivli च्या योगिता थोटांगेंची अशीही विठ्ठलभक्ती; पुणे-पंढरपूर सायकलवारी यशस्वी

68
Dombivli च्या योगिता थोटांगेंची अशीही विठ्ठलभक्ती; पुणे-पंढरपूर सायकलवारी यशस्वी
Dombivli च्या योगिता थोटांगेंची अशीही विठ्ठलभक्ती; पुणे-पंढरपूर सायकलवारी यशस्वी
  • कल्याण : प्रतिनिधी

आषाढी वारीच्या (Ashadhi Wari) पार्श्वभूमीवर दरवर्षी पुणे ते पंढरपूर अशी सायकल वारी काढणाऱ्या इंडो ॲथलेटिक्स सोसायटी या संस्थेने यंदा दहावे वर्ष साजरे केले. शरीर तंदुरूस्ती, भक्ती आणि निसर्ग संवर्धन या उद्देशाने काढल्या जाणाऱ्या या वारीत डोंबिवली एमआयडीसीच्या (Dombivli MIDC) निवासी विभागामध्ये राहणाऱ्या योगिता थोटांगे यांनी सहभाग नोंदवून वारी यशस्वी पूर्ण केली.

यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून २ हजार ३५० सायकलस्वार पुण्यात जमले होते. त्यात ३०० महिला सायकलस्वारांचा सहभाग होता. २० जून रोजी पहाटे सर्वांनी पुण्यातून प्रस्थान ठेवून दहा ते अकरा तासात पंढरपूर (Pandharpur) गाठले आणि विठुरायाचे दर्शन घेतले.

(हेही वाचा – भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाडलेली J-10CE जातीची लढाऊ विमाने Bangladesh चीनकडून खरेदी करणार )

पुणे (देहू रोड किंवा हडपसर) ते पंढरपूर असे २०१ ते २३५ किलोमीटर अंतर सायकलने कापायचे असते. २० जून रोजी पहाटे सर्वांनी पुण्यातून निघून अंदाजे १० ते ११ तासांत सर्वांनी पंढरपूर गाठून विठू माऊलीचे दर्शन घेतले. वारीमध्ये डोंबिवलीतून (Dombivli) सहभागी झालेल्या योगिता थोटांगे या एकमेव महिला होत्या. ४३ वर्षीय योगिता यांनी कडक उन्हातही न थकता हा प्रवास पूर्ण केला. पुणे-पंढरपूर दरम्यान वाटेत अनेक भक्तगण, उत्साही नागरिक त्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करीत होते. ठिकठिकाणी विठ्ठलभक्त आणि नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात सर्व सायकलस्वारांचे स्वागत केले. वारी पूर्ण केल्यावर योगिता यांना शाल आणि पदक देऊन गौरविण्यात आले. या वाटचालीत त्यांना सतीश काकलीज यांचे मार्गदर्शन लाभले.

जुलै महिन्यात पुन्हा वारी

ब्युटी पार्लरचा व्यवसाय आणि घरातील जबाबदाऱ्या सांभाळून योगिता सायकल चालवण्याची आवड जपतात. यापूर्वीही त्यांनी देशभरातील अनेक सायकल स्पर्धांमध्ये भाग घेऊन पदके पटकावली आहेत. येत्या जुलै महिन्यात डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील महिला आणि पुरूष डोंबिवली ते पंढरपूर अशी सायकल वारी करणार आहेत. या वारीचे नेतृत्व आणि मार्गदर्शन योगिता थोटांगे करणार आहेत. योगिता यांच्या या कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.