Pune : रस्ते खोदून पुण्याची करणार सुरक्षा

52
Pune : रस्ते खोदून पुण्याची करणार सुरक्षा

पुण्यात (Pune) सीसीटीव्ही प्रकल्पासाठी शहरातील जवळपास ६१ रस्त्यांवर खोदकाम केलं जाणार आहे. आधीच वाहतूक कोंडीच्या समस्येचा सामना करणाऱ्या पुणेकरांना आणखी मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोलिसांनी हे काम ३१ मे पर्यंत पूर्ण करावं अशी तंबीच महापालिकेला दिली असल्याची माहिती समजते.

(हेही वाचा – Pakistan : पाकिस्तान्यांशी ‘गोतावळा’ वाढवून भारतात राहणाऱ्या मुसलमान महिलांची झाली गोची)

महापालिकेच्या मलनिःसरण विभाग, पाणीपुरवठा विभाग आणि पोलिसांच्या सीसीटीव्ही प्रकल्पासाठी रास्त खोदण्यास वाहतुक पोलिसांनी पुणे महापालिकेला (Pune Municipality) परवानगी दिलीय. वाहतूक पोलिसांनी महापालिकेला कामाची परवानगी दिली असली तरी ही सर्व कामं ३१ मे २०२५ पर्यंत पूर्ण करा असेही आदेश दिलेत. जर ३१ मे पर्यंत काम पूर्ण झालं नाही तर संबंधित ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिलीय. (Pune)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.