Pune Naxal Arrest : औद्योगिक शहरे नक्षलवाद्यांच्या रडारवर ?; नक्षलवादी प्रशांत कांबळेची एटीएसकडून चौकशी सुरु

Pune Naxal Arrest : नक्षलवादी पुणे, नागपूर, ठाणे (Thane) सारख्या शहरातील झोपडपट्ट्यांकडे नवं रिक्रुटमेंट सेंटर म्हणून पाहत आहेत का?, याचा तपास केला जात आहे.

115

मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी प्रशांत उर्फ लॅपटॉप कांबळे (Prashant Kamble) जंगलातून निघून पुणे परिसरात सक्रीय आहे, याची माहिती मिळाल्यामुळे गेले काही महिने महाराष्ट्राच्या नक्षलविरोधी पथकाने (ANO) त्याच्या नातेवाईकांच्या माध्यमातून त्याला आत्मसमर्पण करण्यासाठी अनेक वेळेला संपर्क केले होते, मात्र प्रत्येक वेळी त्याने आत्मसमर्पण करण्यास नकार दिले. नुकतंच एटीएसने त्याला अटक केली आहे. एटीएस करत असलेल्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.  (Pune Naxal Arrest)

2011 मध्ये एटीएसने पश्चिमी घाट परिसरात नक्षलवाद वाढवण्यासाठी खंडणी गोळा करण्याचा एक गुन्हा दाखल केला होता.. त्याप्रकरणी प्रशांत कांबळे ही वॉन्टेड होता आणि त्याच प्रकरणी एटीएसने त्याला अटक केली आहे.

(हेही वाचा – Rahul Gandhi कुठल्या देशाचे नागरिक आहेत ?; अलाहाबाद उच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्णय घेण्याचे निर्देश)

नक्षलवादी त्यांच्या चळवळीचा शहरी भागात विस्तार करण्यासाठी पुणे आणि जवळपासच्या औद्योगिक पट्ट्यांवर लक्ष केंद्रित करून आहेत का? या भागातील औद्योगिक पट्ट्यात कामगारांच्या रोष वाढवत औद्योगिक अशांततेसोबत सामाजिक अशांतता वाढवण्याचे नक्षलवाद्यांचे (Naxal) नियोजन आहे का? नक्षलवादी पुणे, नागपूर, ठाणे (Thane) सारख्या शहरातील झोपडपट्ट्यांकडे नवं रिक्रुटमेंट सेंटर म्हणून पाहत आहेत का? अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे प्रशांत उर्फ लॅपटॉप कांबळे 2011 मध्ये पुण्यातून अचानक बेपत्ता झाला होता, आणि त्याने गडचिरोलीच्या (Gadchiroli) जंगलात सशस्त्र नक्षलवादाचा रीतसर ट्रेनिंग घेऊन मिलिंद तेलतुंबडे (Milind Teltumbde) सारख्या टॉप नक्षल कमांडर सोबत अनेक वर्ष काम केले होते.

कोण आहे प्रशांत कांबळे?
  • 2011पूर्वी पुण्यातील एका झोपडपट्टी मध्ये राहून कम्प्युटर्स आणि लॅपटॉप दुरुस्तीचा काम करत होता.
  • एका सांस्कृतिक मंचाच्या माध्यमातून थेट नक्षलवाद्यांपर्यंत पोहोचला.
  • नक्षलवाद्यांच्या कोरची कुरखेडा दरेकसा या KKD दलम मध्ये सहभागी होऊन शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण घेतले.
  • मिलिंद तेलतुंबडे सारख्या टॉपच्या नक्षल कमांडर सोबत अनेक एन्काऊंटर्स मध्ये सहभागी झाला.
  • प्रशांत कांबळे सोबत त्याच काळात संतोष शेलार नावाचा तरुणही पुण्यातून अशाच पद्धतीने बेपत्ता होऊन थेट नक्षलवाद्यांसोबत सहभागी झाला होता.
  • अनेक वर्ष जंगलातील नक्षलवाद्यांसोबत काम केल्यानंतर त्यांच्याकडून नवीन टास्क मिळवून प्रशांत कांबळे शहरी भागात परतला. पुण्यात भूमिगत राहून काम करू लागला.
  • तपास यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे प्रशांत कांबळे अनेक वर्षांपूर्वी जंगलातून विशेष टास्क घेऊन बाहेर पडला.
  • तेव्हापासून लॅपटॉप कांबळेने (Laptop Blanket) पुणे किंवा जवळपासच्या भागात कधी आदिवासी मुलांना शिकवण्याचे काम केले, तर कधी एखाद्या एनजीओमध्ये काम करत सामाजिक क्षेत्रात वावरला.
  • पुण्यात डिलिव्हरी बॉय म्हणून काम करून तो शेकडो पुणेकरांच्या घरापर्यंत ही सहज जात होता. (Pune Naxal Arrest)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.