पुण्यातील Metro च्या विस्तारीकरणाला गती

116
पुण्यातील Metro च्या विस्तारीकरणाला गती

पुणे शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या विस्तारित टप्प्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी देणे, तसेच खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासलासोबतच नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग या टप्प्यांना ‘पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डा’ची मान्यता मिळविण्यासंदर्भात केंद्रीय नगरविकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांची केंद्रीय सहकार आणि हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यात दिल्लीत नुकतीच चर्चा झाली. (Metro)

(हेही वाचा – Maharashtra Government : ‘डिजिटल पुश’ अंतर्गत शिस्तभंगाची सूचना पाठविण्यात येणार; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय)

यावेळी विस्तारीकरणाचा हा प्रस्ताव लवकरात लवकर केंद्रीय मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात यावा, अशी मागणी मोहोळ यांनी खट्टर यांच्याकडे केली. पुणे मेट्रोचे (Metro) दोन्ही मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू असताना वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या मेट्रो (Metro) मार्गाचे विस्तारीकरण प्रस्तावित आहे. यासाठी महामेट्रोने सविस्तर विकास आराखडा तयार केला असून याला राज्य सरकारचीही मंजुरी मिळालेली आहे.

(हेही वाचा – Pakistani Spy : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या माजी मंत्र्यांच्या खाजगी सचिवाला बेड्या; ज्योती मल्होत्राशी संबंध ?)

तसेच पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डाचीही मान्यता ११ मार्च रोजी मिळाली असून, आता केंद्रीय मंत्रिमंडळाची अंतिम मंजुरी प्रतीक्षेत आहे. तसेच मेट्रोच्या (Metro) विस्तारीकरणाचा भाग म्हणून खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला हा मार्गही दृष्टिक्षेपात असून सोबतच नळस्टॉप-वारजे-माणिकबाग हा जोडमार्गही प्रस्तावित आहे. याही प्रकल्पाला राज्य सरकारची मंजुरी मिळाली असून, ‘पीआयबी’ची मान्यता प्रतीक्षेत आहे. तसेच ‘पीआयबी’च्या मान्यतेनंतर हे प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळात ठेवण्यात यावेत, यासाठी मोहोळ यांनी खट्टर यांच्याशी चर्चा केली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.