Public Toilets : प्रत्येक शौचालयांत पूर्णवेळ स्वच्छता

व्हॅक्यूम क्लिनिंग मशीन, ब्रशिंग मशीन, रोड क्लिनर द्वारे शौचालयांची स्वच्छता

609
Public Toilets : प्रत्येक शौचालयांत पूर्णवेळ स्वच्छता

मुंबई महानगरातील शौचालयांची स्वच्छता आणि पुनर्बांधणीची मोहीम मुंबई महानगरपालिकेने हाती घेतली आहे. त्यासाठी १३०० कोटी रुपयांची निविदा काढली आहे. मुंबई महानगरात एकूण आठ हजार सार्वजनिक शौचालये आहेत. त्यापैकी म्हाडाचे तीन हजार शौचालये महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत. यामध्ये सव्वा लाख शौचकुपे असून या प्रत्येक शौचालयासाठी पूर्णवेळ स्वच्छता कर्मचारी तैनात राहणार आहे. संबंधित कंपनीकडून येत्या दोन महिन्यात मुंबई महानगरात व्हॅक्यूम क्लिनिंग मशीन, ब्रशिंग मशीन, रोड क्लिनर अशा प्रकारची अद्यावत यंत्रसामुग्री उपलब्ध होणार आहे. त्यामुळे लवकरच मुंबई महानगरातील सार्वजनिक शौचालये अधिक स्वच्छ आढळून येतील, असा विश्वास महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी व्यक्त केला आहे. (Public Toilets)

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बालसिंह चहल यांनी सकाळी ७.३० वाजेपासून सखोल स्वच्छता मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग घेतला. महापालिका आयुक्त चहल यांनी मशीद परिसरातील काझी सईद मार्ग, रघुनाथ महाराज मंदीर, जंजीकर मार्गाची स्वच्छता केली. त्याचप्रमाणे सार्वजनिक प्रसाधनगृहांच्या स्वच्छता, निर्जंतुकीकरण कार्यवाहीची तपासणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, उप आयुक्त (परिमंडळ १) डॉ. संगीता हसनाळे, प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) प्रशांत तायशेटे, सहायक आयुक्त (बी विभाग) उद्धव चंदनशिवे, सहायक आयुक्त (ए विभाग) जयदीप मोरे यांच्यासह बी विभागातील जनाबाई रोकडे शाळेच्या विद्यार्थ्यांनी, विविध सामाजिक संस्था आणि परिसरातील नागरिकांनीदेखील उत्स्फूर्त सहभाग घेतला. ‘क्रॉस फिट’ या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छतेचा संदेश देणारे पथनाट्य सादर केले. (Public Toilets)

शौचालय स्वच्छतेसाठी १३०० कोटी रुपये करणाार खर्च

मुंबई महानगरात एकूण आठ हजार सार्वजनिक शौचालये आहेत. त्यापैकी म्हाडाचे तीन हजार शौचालये महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत. यामध्ये सव्वा लाख शौचकुपे असून या प्रत्येक शौचालयासाठी पूर्णवेळ स्वच्छता कर्मचारी तैनात राहणार आहे. त्यासाठी १३०० कोटी रुपयांची निविदा काढली आहे. यासाठी जागतिक स्तरावरील कंपन्यांना या शौचालयांची (Public Toilets) स्वच्छता करण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. लवकरच या प्रत्येक शौचालयासाठी पूर्णवेळ स्वच्छता कर्मचारी तैनात राहणार असल्याचे इक्बालसिंह चहल यांनी म्हटले आहे. संबंधित कंपनीकडून येत्या दोन महिन्यात मुंबई महानगरात व्हॅक्यूम क्लिनिंग मशीन, ब्रशिंग मशीन, रोड क्लिनर अशा प्रकारची अद्यावत यंत्रसामुग्री उपलब्ध होणार आहे. त्यामुळे लवकरच मुंबई महानगरातील सार्वजनिक शौचालये अधिक स्वच्छ आढळून येतील, असेही यावेळी आयुक्त डॉ. चहल यांनी सांगितले. (Public Toilets)

(हेही वाचा – Asaram Bapu : सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आसाराम बापूंची शिक्षा माफीची याचिका)

मुंबईकरांना आवाहन

सखोल स्वच्छता मोहिमेत आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी आज मुंबईकरांनाही साद घातली. मुंबई स्वच्छ ठेवणे, सुंदर ठेवणे ही केवळ महाराष्ट्र शासन किंवा बृहन्मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी नसून, ते प्रत्येक मुंबईकराचे कर्तव्य आहे. त्यामुळे विविध सामाजिक संघटना, शाळा, महाविद्यालये, तरुण आणि लोकप्रतिनिधी आदींनी या चळवळीत सहभागी व्हावे. येणाऱ्या पिढीसाठी, त्यांच्या भविष्यासाठी आपल्याला एक चांगले, स्वच्छ आणि सुंदर शहर अबाधित ठेवायचे आहे, असे आवाहनही यानिमित्ताने चहल यांनी केले. ज्या-ज्या ठिकाणी सखोल स्वच्छता मोहीम सुरू असेल तेथे प्रत्येक नागरिकाने सहभागी होवून आपला परिसर अधिकाधिक स्वच्छ ठेवावा, असेही डॉ. चहल यांनी विनम्र आवाहन केले. (Public Toilets)

साथ रोगांचे प्रमाण नक्कीच घटणार

गत १४ आठवड्यांपासून मुंबई महानगरात सुरू असलेल्या सखोल स्वच्छता मोहिमेमुळे मुंबईतील वायू गुणवत्तेत सुधारणा झाली आहे. वायू प्रदूषणामध्ये झपाट्याने घट झाली आहे. स्वच्छता मोहिमेमुळे मुंबईकरांचे सार्वजनिक आरोग्य सुधारण्यात मदत होणार आहे. या मोहिमेमुळे यंदाच्या जून महिन्यात संसर्गजन्य, साथजन्य आजारांचे प्रमाण नक्कीच घटलेले आढळेल, असा आशावाद आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी व्यक्त केला. या मोहिमेत जर प्रत्येक नागरिकाने सहभाग घेतला तर ही मोहीम जभगरात नक्कीच आदर्श मानली जाईल, असा विश्वास देखील चहल यांनी अखेरिस व्यक्त केला. (Public Toilets)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.