पावसाळी धोका? गर्दीच्या मेट्रो स्थानकांसाठी तात्काळ “आपत्कालीन प्लॅन” तयार करा; मंत्री Adv. Ashish Shelar यांचे निर्देश

46
पावसाळी धोका? गर्दीच्या मेट्रो स्थानकांसाठी तात्काळ "आपत्कालीन प्लॅन" तयार करा; मंत्री Adv. Ashish Shelar यांचे निर्देश
  • प्रतिनिधी

मुंबईतील मुसळधार पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील गर्दीच्या मेट्रो स्थानकांवर संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सुसज्ज आणि ठोस कृती आराखडा तयार करा, असे स्पष्ट निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार (Adv. Ashish Shelar) यांनी सोमवारी संबंधित यंत्रणांना दिले.

एमएमआरडीए कार्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत त्यांनी स्पष्ट सांगितले की – “मेट्रो आणि संबंधित सर्व यंत्रणांनी एकसंघ टीम म्हणून काम करा, जबाबदारी झटकण्याऐवजी समन्वय साधा. कुणावरही दोष टाकण्याची वेळच येऊ नये.” या आढावा बैठकीस एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त विक्रम कुमार, अश्विन मुदगल, आस्तिककुमार पांडे, महा मेट्रोच्या संचालिका रुबल अग्रवाल यांच्यासह मुंबई महानगरपालिका आणि विविध प्राधिकरणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

(हेही वाचा – IPL 2025, PBKS in Final : ‘कोलकात्याने श्रेयसला सोडून चूक केली,’ – अंजुम चोप्रा)

पावसाळी तयारीचा रिपोर्ट कार्ड :
  • आपत्कालीन कंट्रोल रूम २४×७ कार्यरत
  • प्रत्येक प्रकल्पासाठी स्वतंत्र खड्डे बुजवण्याची यंत्रणा तयार
  • 114 किमी बॅरिकेट्स हटवले
  • 19 ठिकाणी रुग्णवाहिका सज्ज
  • 107 ठिकाणी पंप बसवले

या सर्व उपाययोजना अधिकाऱ्यांनी सादर केल्या. भूमिगत मेट्रो स्थानकांमध्ये वायफाय सुविधा द्या आणि सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही त्रुटी ठेवू नका, अशाही सूचना मंत्री शेलार (Adv. Ashish Shelar) यांनी दिल्या.

(हेही वाचा – Pakistan Fake Report : भारत-रशिया मैत्रीत फूट पाडण्याचा प्रयत्न फेल; पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड)

प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्लॅन – अंधेरी, घाटकोपरसारख्या स्टेशनसाठी विशेष मार्गदर्शक आराखडा!

शेलार (Adv. Ashish Shelar) यांनी स्पष्ट केलं की – “मेट्रो स्टेशनवर जर कोठे गर्दीमुळे आपत्कालीन स्थिती निर्माण झाली, किंवा मेट्रो सेवेचा वेग मंदावला, तर प्रवाशांना त्वरित बाहेर काढण्यासाठी तसेच पर्यायी वाहतूक देण्यासाठी पालिका, बेस्ट आणि मेट्रो प्राधिकरणांनी मिळून विशेष “आपत्कालीन प्लॅन” तयार करावा.”

कोविड संदर्भातही स्पष्टता – घाबरू नका, सज्ज राहा!

याच ठिकाणी आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग व मुंबई महापालिकेसोबतही कोविड परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. मंत्री शेलार (Adv. Ashish Shelar) यांनी सांगितले की – “कोविडची संख्या नियंत्रणात असली तरी मधुमेह, उच्च रक्तदाब आणि गंभीर आजार असलेल्या नागरिकांनी मास्क वापरावा, आणि लसीकरणाबाबत दक्षता घ्यावी.” केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महापालिका आणि राज्य आरोग्य यंत्रणा समन्वयाने कार्यरत आहे.

(हेही वाचा – IPL 2025, PBKS in Final : सामना जिंकूनही कर्णधार श्रेयस अय्यर शशांक सिंगवर का रागावला?)

एकत्र आलो तर निभावू – शेलार यांची जबाबदार यंत्रणांना साद!

या संपूर्ण बैठकीचा केंद्रबिंदू ठरला तो म्हणजे “एक टीम, एक मिशन”. उपनगर पालकमंत्री शेलार (Adv. Ashish Shelar) यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचा आणि परस्पर समन्वयाचा दिला आहे संदेश.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.