Potholes : रस्त्यांची आजवर हजार कोटींची कामे, तरीही खड्ड्यांचा खर्च वाढता वाढता वाढेच

396
Mumbai Road Potholes : मुंबईत २२७ दुय्यम अभियंत्यांची रस्त्यांवरील खड्ड्यांवर नजर
  • सचिन धानजी,मुंबई

पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या खड्ड्यांच्या (Potholes) समस्येवर मात करण्यासाठी महापालिकेच्यावतीने प्रयत्न करण्यात येत असून यंदाही महापालिकेने खड्डे बुजवण्यासाठी सुमारे ३०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. मात्र, एका बाजुला मागील दोन वर्षांमध्ये खड्डे बुजवण्यासाठी केलेला खर्च आणि खराब रस्त्यांचे केलेले रि-सरफेसिंगवरील खर्च याचा हमी कालावधी शिल्लक आहे तसेच सिमेंट काँक्रिटच्या सर्व रस्त्यांची कामे देण्यात आल्याने याचाही या प्रकल्प रस्ते कामांसाठी संबंधित कंत्राटदारांकडूनच बुजवून घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे रस्ते कामांचा झालेला विकास आणि होऊ घातलेल विकास लक्षात घेता खड्ड्यांवरील खर्च कमी होण्याऐवजी उलट हा खर्च वाढतच जात असल्याने खड्ड्यांच्या नावावर होणारी लुट अद्यापही सुरुच असल्याचे दिसून येत आहे. (Potholes)

मुंबई महानगरपालिकेने विविध रस्त्यांच्या दुरुस्ती योग्य ठिकाणी (बॅड पॅच) मास्टिक अस्फाल्टद्वारे डागडुजी करणाची कामे हाती घेतली आहेत. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे (Potholes) दुरूस्ती कामांसाठी महापालिकेच्या वतीने ७ परिमंडळांत एकूण मिळून १४ कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. सात परिमंडळांमध्ये प्रत्येकी दोन कंत्राटदारांची नेमणूक केली असून ९ मीटर पेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांसाठी स्थानिक वॉर्डच्या पातळीवर आणि ९ मीटर पेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यासाठी रस्ते विभागाच्या अखत्यारित अशाप्रकारे स्वतंत्र कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीत ९ मीटर पेक्षा मोठ्या रुंदीच्या मार्गावरील रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीसाठी प्रती विभाग कार्यालय १० कोटी रुपये आणि ९ मीटर पेक्षा कमी रुंदीच्या मार्गासाठी सुमारे दीड कोटी रुपये याप्रकारे सुमारे २७५ कोटी रुपयांच्या आसपास खड्डे आणि खराब रस्त्यांची सुधारणा करण्यात येणार आहे. (Potholes)

(हेही वाचा – Narendra Modi 3.0 : केंद्रीय मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, महाराष्ट्रातील मंत्र्यांकडे कोणकोणती खाती?)

मागील दोन वर्षांमध्ये सिमेंट काँक्रिटच्या सुमारे ४०० किलोमीटरची कामे पहिल्या टप्प्यात सुरु करण्यात आली आहेत आणि दुसऱ्या टप्प्यातील कामांची मंजुरी अंतिम टप्प्यात आहे. यासाठी आता सुमारे १३ हजार कोटींचा खर्च करण्यात येत आहे. यातील मुंबईत सिमेंट कॉंक्रिट रस्त्यांची बहुतांश कामे पूर्णत्वाकडे आहेत, तर काही कामे प्रगतिपथावर आहेत. यामध्ये मुंबई शहर भागात २४ ठिकाणी, तसेच पूर्व उपनगरात ३२ ठिकाणी तर पश्चिम उपनगरामध्ये ८७ ठिकाणी कामे सुरू आहेत. विशेष म्हणजे रस्त्यांची कामे सुरु असल्याने त्यावर खड्डे (Potholes) पडल्यास ते खड्डे बुजवण्याची जबाबदारी ही संबंधित कंत्राटदाराची आहे. (Potholes)

त्यातच दुसऱ्या टप्प्यातील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटच्या कामांचे कार्यादेश देण्यात आले नसले तरी मागील वर्षी यातील बहुतांशी खराब ररस्त्यांचे रि-सरफेसिंग करण्यात आले, तसेच काहींवरील खड्डे बुजवण्यात आले आहेत. त्यामुळे याचाही हमी कालावधी शिल्लक आहे. याशिवाय मुंबईतील सर्वच रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करतानाच सहा मीटर खालील रस्त्यांचेही सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचीही कामे महापालिकेने हाती घेतली आहे. मागील वर्षी हाती घेतलेल्या या छोट्या रस्त्यांची कामे आत पूर्ण होत आली असून यासाठी तब्बल २६.१७ कोटींचा खर्च वाढला आहे. त्यामुळे या छोट्या रस्त्यांच्या कामांवर तब्बल ६० कोटींचा खर्च झाला आहे. मागील वर्षी हाती घेतलेल्या या कामांसाठी सन २०२३-२४च्या वर्षांत ३१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. परंतु यासाठीचा निधी कमी पडल्याने वाढलेल्या खर्चाची २६ कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात येत आहे. त्यामुळे छोट्या रस्त्यांवरील बहुतांशी कामे झालेली आहेत. (Potholes)

(हेही वाचा – BMC Head Office : महापालिका मुख्यालय इमारतीतील कर्मचारी भीतीच्या छायेखाली, सलग दुसऱ्यांदा सुट्टीच्या दिवशी घटना)

मुंबईत सध्या रोडची मेगा प्रोजेक्ट कामे सुरु आहेत, यासह इतर रस्त्यांची अशाप्रकारे आतापर्यंत सुमारे २० हजार कोटींची कामांचे कार्यादेश देण्यात आले आहेत. त्यामुळे प्रकल्प रोड व हमी कालावधी अंतर्गत या रस्त्यांवर खड्डा आढळून आल्यास ते बुजवणे हे संबंधित कंत्राटदाराची जबाबदारी आहे. यातच जवळपास ९५ टक्के रस्त्यांचा समावेश आहे. मागील वर्षी महापालिकेने खड्डे (Potholes) दुरुस्ती व प्रतिबंधात्मक देखभालीसाठी २२५ कोटी रुपयांचा खर्च केला होता. तसेच मास्टिक असल्फाटची द्वारे रि-सरफेसिंगद्वारे सुधारणा केली, त्यासाठी सुमारे २०० ते ३०० कोटींचा खर्च झाला. शिवाय पूर्व, पश्चिम महामार्ग आणि ईस्टर्न फ्री वेचेही रस्ते खड्डे मुक्त बनवण्यासाठी २५० कोटींचा खर्च झाला आहे. मास्टिक डांबराद्वारे केलेल्या रस्ता सुधारणेचा कालावधी हा पाच वर्षांचा असतो. हे सर्व रस्ते आजही सुस्थितीत आहेत, असे महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, याच रस्त्यांचे पुन्हा एकदा अधिकाऱ्यांनी अंदाजपत्रक तयार केले. विशेष महापालिकेच्यावतीने २४ विभागीय कार्यालयांना त्याच्या हद्दीतील खड्डे बुजवण्यासाठी स्वत:च्या डांबराच्या प्लांटमधून कोल्ड मिक्सचा मागणीनुसार पुरवठा करत असते. त्यामुळे जेव्हा केवळ सुमारे २००० किमी अंतराच्या रस्त्यांपैंकी ३०० ते ४०० किमीचे रस्ते काँक्रिटचे होते, तेव्हा फक्त ४० ते ४८ कोटी रुपये खर्च केले जायचे, परंतु आता २ हजार किमीच्या रस्त्यांची कामे सुरु आहेत, तसेच काहींचा हमी कालावधी असूनही महापालिकेच्यावतीने खड्ड्यांच्या नावावर सुमारे २०० कोटी रुपये खर्च केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Potholes)

याबाबत अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यापूर्वी किती खर्च झाला होता याची कल्पना नाही, पण आम्ही तरतूद केली याचा अर्थ त्या पैशांचा खर्च झाला असा होत नाही. नागरिकांना कुठेही खड्डयांमुळे त्रास होऊ नये यासाठी ही तरतूद करून ठेवली आहे. यंदा हे खड्डे मास्टिक डांबरद्वारे बुजवण्याचे निर्देश दिले असून कुठेही वेडेवाकडे खड्डे बुजवण्याऐवजी चौकोनी आकारात समपातळीत दिसतील असेच हे खड्डे बुजवले जातील याकडे विशेष लक्ष आहे. जर हे खड्डे (Potholes) योग्य प्रकारे बुजवले नसतील तर अभियंत्यांनी पुन्हा ते काढून नव्याने बनवून घ्यावेत, परंतु योग्यप्रकारे खड्डे बुजवले असतील आणि त्याचे पैसे दिले गेले, तर संबंधित अभियंत्यासह कंत्राटदारावरही कारवाई केली जाईल, असाही इशारा देण्यात आला असल्याचे बांगर यांनी स्पष्ट केले. प्रत्येक विभागात ९ मीटरपेक्षा अधिक रूंदीच्या रस्त्यासाठी २ मास्टिक कुकर आणि ९ मीटरपेक्षा कमी रूंदीच्या रस्त्यांसाठी १ मास्टिक कुकर याप्रमाणे २४ विभागांमध्ये ७२ मास्टिक कुकरचा वापर करण्यासाठी निर्देश दिले असून त्यानुसार भविष्यात वेळेतच खड्डे बुजवले जाईल. तसेच नागरिक, लोकप्रतिनिधी आणि माध्यमांवरील बातम्या याच्या आधारे खड्ड्यांच्या तक्रारी असल्यास त्यांचे निवारण तातडीने करण्याच्या दृष्टीकोनातून यंत्रणा सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (Potholes)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.