पिंपरी-चिंचवड महापालिकेने खड्डे व्यवस्थापन प्रणाली विकसित केली आहे. या अंतर्गत ‘पॉटहोल मॅनेजमेंट’ हे ‘ॲप’ विकसित करण्यात आले असून, नागरिकांना या ॲपद्वारे (Pothole App) खड्ड्यांची तक्रार नोंदविता येणार आहे.
महापालिकेची पावसाळापूर्व कामांची तयारी सुरू आहे. (Pimpri Chinchwad Muncipal Corporation) पावसाळ्यामध्ये खड्ड्यांची समस्या सातत्याने उद्भवते. (Potholes in Road) या समस्येवर उपाय म्हणून महापालिकेने ‘पॉटहोल ॲप’ विकसित केले आहे. या ॲपमुळे खड्ड्यांची तक्रार नोंदवण्याची आणि त्या तक्रारींचे निराकरण करण्याची प्रक्रिया सोपी आणि सुलभ होणार आहे. नागरिक या ॲपद्वारे खड्ड्याची तक्रार नोंदवू शकतात आणि तिच्या निराकरणाविषयी अद्ययावत माहिती मिळवू शकतात.
(हेही वाचा – IDF : ‘आम्ही सर्व ओलिसांना परत करू, तुम्ही बॉम्बहल्ले थांबवा’; गाझा प्रमुख ठार झाल्यानंतर हमासची नरमाईची भूमिका)
ॲपद्वारे खड्ड्याची तक्रार नोंदविण्यासाठी नागरिकांना पॉटहोल ॲपमध्ये लॉग-इन करावे लागणार आहे. त्यानंतर नागरिक खड्ड्याचे छायाचित्र काढून त्याच्या स्थानासह ते अपलोड करू शकतात. ही माहिती आपोआप संबंधित विभागातील कनिष्ठ अभियंत्यांना त्यांच्या प्रभागानुसार पाठवली जाईल. त्याच वेळी ती माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पाठवली जाईल. तक्रार नोंदवल्यानंतर तिचे निराकरण करण्यासाठी ती संबंधित अधिकाऱ्याकडे दिली जाईल. दिलेल्या तक्रारीचे निराकरण झाले नाही, तर त्या भागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना ई-मेल आणि संदेश पाठवण्यात येईल.
एखादी तक्रार कनिष्ठ अभियंत्यांच्या अधीन नसल्यास ती महापालिकेच्या ज्या विभागाशी संबंधित आहे, त्या विभागाकडे पाठवण्यात येईल. तक्रारीचे निराकरण संबंधित विभाग किंवा अभियंता यांनी केल्यानंतर ती तक्रार ॲपमध्ये बंद केली जाईल आणि तक्रारदारास छायाचित्रासह निराकरणाची माहिती ई-मेल, संदेशाद्वारे कळवली जाईल, असे महापालिकेच्या स्थापत्य विभागाने सांगितले. (Pimpri Chinchwad Muncipal Corporation)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community