-
प्रतिनिधी
मुंबईतील नागरिकांची जीवनवाहिनी असलेल्या बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाला (बेस्ट) अधिक सक्षम आणि स्वयंपूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बेस्टच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेस्टने (BEST) अत्याधुनिक बस आणि प्रभावी सोयीसुविधांसह स्वत:चे उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्याचे निर्देश दिले. बांद्रा, दिंडोशी आणि देवनार बस डेपोंच्या पुनर्विकासासाठी धोरण निश्चित करून व्यावसायिक गाळे, रहिवास आणि बस आगार अशी रचना करण्याचे सूचवले, ज्यामुळे बेस्टचे उत्पन्न वाढेल.
“मुंबईतील नागरिकांची जीवनवाहिनी म्हणून ‘बेस्ट’ची ओळख आहे. नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर, आरामदायी होण्यासाठी ‘बेस्ट’ने अत्याधुनिक बस आणि प्रभावी सोयीसुविधा पुरविण्यासोबत स्वत:चे उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठकीत दिले.” प्रवाशांना बसच्या वेळेची आणि स्थानाची माहिती मिळावी यासाठी जीपीएस प्रणालीची त्वरित अंमलबजावणी आणि गुगलशी करार करण्याची योजना आखली आहे. मुंबईतील लोकल रेल्वे, मेट्रो, मोनोरेल आणि बससाठी एकाच तिकिटात प्रवासाची सुविधा देणाऱ्या सिंगल मोबिलिटी प्लॅटफॉर्मची निर्मिती प्रगतीपथावर आहे, ज्याचा बेस्टला फायदा होईल. छोट्या, अरुंद रस्त्यांसाठी अत्याधुनिक छोट्या बस घेण्यासाठी नॅशनल क्लिन एअर पॉलिसी (एनसीएपी) निधीचा वापर करण्याचेही निर्देश देण्यात आले.
(हेही वाचा – Unauthorized Construction : रघुवंशी मिलमधील अनधिकृत बांधकामावर हातोडा)
मराठी सिनेमासाठी थिएटर्स आणि मनपाच्या बजेटमध्ये तरतूद
मंत्री आशिष शेलार यांनी बस डेपोंच्या पुनर्विकासात करमणूक केंद्रांचा समावेश करण्याची सूचना केली. पाच डेपोंच्या ठिकाणी मराठी सिनेमा थिएटर्स उभारल्यास मराठी चित्रपटांना प्रोत्साहन मिळेल आणि बेस्टचे उत्पन्न वाढेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. तसेच, बेस्टवरील (BEST) आर्थिक भार कमी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या बजेटमध्ये वाहतुकीसाठी तीन टक्के राखीव निधीची तरतूद करण्याचेही सुचवले.
उपमुख्यमंत्री शिंदेंचे अत्याधुनिक बस करण्याचे नियोजन
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेट्रो स्टेशन आणि बेस्ट बस मार्गांचे समन्वय साधून छोट्या, अत्याधुनिक बसचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले. बेस्टच्या (BEST) जागांचा उपयोग उत्पन्नवाढीसाठी करावा, असेही ते म्हणाले.
(हेही वाचा – लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी कोर्टाचा मान ठेवणार का? मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी उपस्थित केला सवाल)
बेस्टची सद्य:स्थिती आणि भाडेवाढीची मागणी
सध्या बेस्टकडे २,७८३ बस असून, त्यापैकी ८७५ इलेक्ट्रिक आहेत. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत सात हजार बसांची आवश्यकता आहे. बेस्टचे (BEST) भाडे रिक्षा, मेट्रो आणि टॅक्सीपेक्षा कमी असल्याने भाडेवाढीची मागणी आहे. २०२७ पर्यंत सर्व बस इलेक्ट्रिक करण्याचा बेस्टचा मानस आहे. बेस्टचे व्यवस्थापक श्रीनिवास यांनी टोल आणि सरकारी कर माफ करणे, तसेच कर्मचाऱ्यांच्या देण्यापोटी १,६५८ कोटी रुपये देण्याची मागणी केली. याबाबत प्रस्ताव सादर केल्यास सरकार सकारात्मक विचार करेल, असे फडणवीस यांनी आश्वासन दिले.
प्रवाशांचे हाल आणि उपाययोजना
बेस्टकडे (BEST) आवश्यक बस ताफा नसल्याने प्रवाशांना तासंतास रांगेत थांबावे लागते. यावर उपाय म्हणून बस ताफा वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. बेस्टच्या या प्रयत्नांमुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर होईल आणि उपक्रम आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, अशी अपेक्षा आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community