वक्फ कायद्याविरोधी आंदोलकांना पुरवली पोलिसांची वाहने; कर्नाटकातील Congress सरकारचा प्रताप

800

Congress : कर्नाटकातील मंगळुरू येथे वक्फ कायद्याविरुद्ध (Waqf Act) झालेल्या मोठ्या निषेधादरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे वाहन आंदोलकांना घेऊन जात असल्याचे दिसत आहे. ही घटना मंगळुरूच्या (Mangalore) अड्यार कन्नूर भागात घडली. कन्नूरच्या शाह गार्डन मैदानावर (Shah Garden Ground) आंदोलन सुरू होते. तसेच यावेळी आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग – ७३ बेकायदेशीरपणे रोखले होते. (Congress)

या व्हिडिओबाबत पोलिसांच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. तसेच आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी पोलिसांच्या वाहनांचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. परंतु हे आरोप फेटाळून लावत, मंगळुरूचे पोलीस आयुक्त अनुपम अग्रवाल यांनी स्पष्ट केले की, या वाहनाचा वापर कोणत्याही आंदोलकांना घेऊन जाण्यासाठी करण्यात आला नव्हता. तर एका जखमी १६ वर्षीय मुलाला रुग्णालयात नेण्यासाठी करण्यात आला होता.

(हेही वाचा – पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा; Vishwa Hindu Parishad ची मागणी)

या वेळी एका टेम्पो ट्रॅव्हलरने १६ वर्षीय मुलाला धडक दिल्याने हा अपघात झाला. त्यानंतर पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतले आणि त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याच वेळी, अनेक आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग रोखल्याबद्दल आणि आपत्कालीन सेवांमध्ये अडथळा आणल्याबद्दल बीएनएस कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.