गेल्या काही महिन्यांपासून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर आकस व द्वेषापोटी पोलीस प्रशासनाकडून कारवाई होत असल्याच्या घटना वारंवार समोर आल्या आहेत. गोहत्या, लव्ह जिहादच्या कित्येक प्रकरणात गुन्हेगारांवर कारवाई करायचे सोडून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनाच टार्गेट केले जात आहे. डिसीपी स्मिता पाटील यांच्याकडून तर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर गोळ्या झाडण्याचे भाषा केली जात आहे. १६ फेब्रुवारी रोजी सांताक्रूझमधील वाकोला परिसरात काही जिहाद्यांनी एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला, त्या विनयभंग झालेल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी जेव्हा बजरंग दलाचे कार्यकर्ते जयकिशन प्रजापती, शिवा प्रजापती, नीरज जयस्वार आणि अन्य कार्यकर्ते वाकोला पोलीस स्टेशन येथे पोहचताच स्थानिक पोलीस (Police) प्रशासनातील अधिकारी शिवाजी शिंदे, अच्युत नाईकरे व अन्य यांच्याकडून गुन्हा दाखल करायचे सोडून, संबंधित गुन्ह्यात न्याय मागायला आलेल्या कार्यकर्त्यांनाच पोलीस डिटेक्शन रूममध्ये फरफटत नेट त्यांना अमानुष मारहाण केली जाते.
वडाळा येथील संगमनगर भागातील हिंदूच्या वतीने श्रीरामनवमी शोभायात्रेचे रविवार, १३ एप्रिल २०२५ रोजी आयोजन करण्यात आले होते. गेल्या १५ वर्षांपासून या शोभायात्रेचे आयोजन वडाळामधील हिंदू समाजाकडून केले जाते. वडाळा आणि वडाळा टूक टर्मिनल पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शोभायात्रेची तारीख २० एप्रिल २०२५ करण्याची सूचना केली, त्याला विश्व हिंदू परिषदेच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समितीने सकारात्मक प्रतिसाद देत मान्यता दिली. परिसरातील २० हून अधिक मंडळांचा सहभाग असलेली श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समितीने मोठ्या उत्साहाने २० एप्रिलच्या कार्यक्रमाची तयारी केली होती. पण यात्रेच्या दोन दिवस अगोदर पोलीसांनी (Police) हिंदूविरोधी भूमिका घेत मुस्लिमांचे लांगुलचालन करत यात्रेच्या तयारीसाठी लावलेले सर्व बॅनर्स, भगव्या पताका काढून टाकल्या, सहभागी संस्थांना धमकावून भाग न घेण्याबाबत तंबी दिली. आयोजकांना परवानगी रद्द केल्याचे सांगितले तसेच वडाळा भिमवाडी आणि परिसरातील अन्य वस्त्यांमध्ये फिरून मेगाफोनवरून शोभायात्रा होणार नाही, कुणी भाग घेतल्यास पोलीस (Police) कारवाई करतील अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या. तसेच २० एप्रिल २०२५ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास वडाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजीव शेजवळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विजय भिसे, शैलेंद्र धिवार पोलिसांच्या ताफ्यासह यात्रेच्या प्रारंभ स्थानी म्हणजेच अँटॉप हिल वेअर हाऊसिंग बिल्डींग कम्पाउंड येथे आले आणि यात्रेसाठी तयार करण्यात आलेले साहित्य हिसकावून घेण्यात आले. कार्यकर्त्यांनी याला शांततेने विरोध करताच त्यांनी कार्यकर्त्यांवर लाठीमार सुरु केला आणि त्यांना उचलून, फरफटत नेत पोलिस (Police) गाडीत भरण्यास सुरुवात केली. त्यात एका कार्यकर्त्याचे डोके फुटले, काहींच्या हाताला, बोटांना जखमा झाल्या, रामचंद्र यादव यांना तर एवढी मारहाण झाली की त्यांना के.ई.एम. इस्पितळातील अतिदक्षता विभागात हलविण्यात आले.
(हेही वाचा भारताने फ्रान्ससोबत २६ Rafale Aircraft खरेदीच्या करारावर केली स्वाक्षरी)
पोलिसांची अशा प्रकारची कारवाई बघितल्यानंतर हिंदू समाजाला प्रश्न पडतो आपण श्रीरामनवमी शोभायात्रा महाराष्ट्रात काढत आहोत की अन्य कोणत्या देशात अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिर पुनर्निर्माणनंतर संबंध देशभरात राममय वातावरण असताना मुंबईत पोलीस (Police) प्रशासनाकडून रामनवमी शोभायात्रा बंद पाडण्यामागे कोणता उद्देश आहे हा प्रश्न प्रकर्षाने निर्माण होतो आहे. एकंदरीत पोलीस प्रशासन सुद्धा मुस्लिमांचे लांगुलचालन आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर द्वेषापोटी कारवाई करत आहे असा आमचा ठाम आरोप आहे. विश्व हिंदू परिषद सातत्याने शासन प्रशासनाला कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करीत आहे. तरीही परिषद आणि बजरंग दल कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे असे आम्हाला वाटते. पोलिसांच्या अशा वर्तनामुळे हिंदू समाजात शासनाबद्दल असंतोष निर्माण होत आहे. चोर सोडून, संन्याशाला फाशी अशा प्रकारचे धोरण पोलीस प्रशासन राबवत आहे. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर आकसपोटी केल्या जाणाऱ्या या सर्व अत्याचाराच्या विरोधात व चोर सोडून संन्याशाला फाशी या मुंबई पोलीस प्रशासनाच्या भूमिकेविरोधात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने उद्या दि. २९ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ठीक ३ वाजता चर्चगेट रेल्वे स्टेशन ते मुंबई पोलीस (Police) आयुक्तालय असा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. यामध्ये हजारो कार्यकर्ते व हिंदू समाज सहभागी होणार आहे.
Join Our WhatsApp Community