Illegal Firecracker Sellers : मुंबईत बेकायदेशीर फटाके विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

मुंबई महानगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष असले तरी मुंबई पोलिसांनी मात्र या फटाके विक्रेत्यांवर कारवाई सुरू केली आहे.

79
Illegal Firecracker Sellers : मुंबईत बेकायदेशीर फटाके विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई
Illegal Firecracker Sellers : मुंबईत बेकायदेशीर फटाके विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

यंदाच्या दिवाळीत मुंबईसह उपनगरात प्रचंड प्रमाणात फटाक्यांची बेकायदेशीर विक्री सुरू आहे. कुठलाही परवाना नसताना, कुठलीही खबरदारी न घेता ही फटाक्यांची दुकाने राजरोसपणे सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष असले तरी मुंबई पोलिसांनी मात्र, या फटाके विक्रेत्यांवर कारवाई सुरू केली आहे. मुंबई पोलिसांनी विविध ठिकाणी जवळपास विना परवाना फटाके विक्री करणाऱ्यावर १०० पेक्षा अधिक गुन्हे दाखल करण्यात आलेले असून सर्वात जास्त कारवाई पश्चिम उपनगरात करण्यात आलेली आहे. शुक्रवार ते रविवारच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आलेली आहे. फटाके विक्रीचा परवाना नसलेल्या मोठ्या दुकानदारांवर कारवाई न करता पोलिसांनी केवळ लहान फटाके विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केल्याचा आरोप कारवाई करण्यात आलेल्या फटाके विक्रेत्यांनी केला आहे. (Illegal Firecracker Sellers)

मुंबईची हवा पुन्हा प्रदुषित झाली असून, मुंबईचा एअर क्वालिटी इंडेक्स २५९ गेला आहे, याची दखल खुद्द मुंबई उच्च न्यायालयाने घेऊन मुंबईत सुरू असलेले बांधकाम व्यवसाय तसेच यंदा दिवाळीत फटाके फोडण्यावर न्यायालयाने काहीसे निर्बंध आणलेले आहे. मुंबई शहरासह उपनगरात यंदाच्या वर्षी बेकायदेशीर फटाके विक्रीचे स्टॉल जागोजागी लावण्यात आलेले आहे. शहरात खूप कमी प्रमाणात परवानाधारक फटाके विक्रेते असले तरी परवान्यात दिलेल्या नियमांचे पालन न करता फटाक्यांचा मोठा साठा करून ठेवत आहे. तसेच यंदाच्या दिवाळीत रस्त्यावर बेकायदेशीर फटाक्यांच्या स्टॉलची संख्या देखील वाढली आहे. मुंबई महानगरपालिकेने या बेकायदेशीर फटाके विक्रीकडे कानाडोळा केला असला तरी मुंबई पोलिसांनी बेकायदेशीर फटाके विक्री करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. (Illegal Firecracker Sellers)

पश्चिम उपनगरातील दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, दिंडोशी, गोरेगाव, वनराई, अंधेरी, डी एन नगर, वाकोला, कस्तुरबा मार्ग, एमएचबी कॉलनी, वर्सोवा, एमआयडीसी, बांगुर नगर तसेच पूर्व उपनगरातील घाटकोपर, गोवंडी, आरसीएफ या पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनापरवाना फटाके विक्री करणाऱ्या दुकानदार, फेरीवाले आणि स्टॉलधारकांवर कारवाई करून त्याच्यावर भारतीय दंड संहिता, स्फोटक कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांकडून करण्यात आलेली कारवाई शुक्रवार ते रविवार या तीन दिवसात करण्यात आल्याचे समजते. (Illegal Firecracker Sellers)

(हेही वाचा – CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खात्याचे कौतुक)

‘या’ विभागात कारवाई नाही

दादर, शिवाजी पार्क, चेंबूर, कुर्ला, पायधुनी, व्ही. पी रोड (गिरगाव) एमआरए मार्ग इत्यादी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विना परवाना फटाके विक्रीचे बेकायदेशीर स्टॉल, फेरीवाले तसेच नियमांचे उल्लंघन करणारे फटाके व्यापारी मोठ्या प्रमाणात असून देखील त्या ठिकाणी पोलिसांकडून अद्याप कुठलेही गुन्हे दाखल करण्यात आलेले नसल्याचे कळते. (Illegal Firecracker Sellers)

कुठे व किती गुन्हे दाखल

पोलिसांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार अंधेरी पोलीस ठाणे ३ गुन्हे, वांद्रे पोलीस ठाणे ३, बांगुर नगर पोलीस ठाणे २, बोरिवली पोलीस ठाणे ९, डी एन नगर ५, दहिसर ७, दिंडोशी ६, घाटकोपर ६, गोवंडी ५, कांदिवली ५, वनराई ४, वर्सोवा ४, कस्तुरबा १२, मालाड २, एमएचबी २, एमआयडीसी ३, आरसीएफ २ आणि वाकोला पोलीस ठाण्यात ४ गुन्हे दाखल करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा साठा देखील जप्त करण्यात आलेला आहे. (Illegal Firecracker Sellers)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.