S Jaishankar : पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग; एस. जयशंकर यांनी पाकला सुनावले

S Jaishankar : पाकव्याप्त काश्मीरमध्येही काही घटना घडू लागल्या आहेत. लोकांची मानसिकता बदलून भारताकडे कल वाढू लागला आहे. एक दिवस तोही भाग भारताशी जोडला जाईल, असा विश्वास जयशंकर यांनी व्यक्त केला.

148
S Jaishankar : पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग; एस. जयशंकर यांनी पाकला सुनावले
S Jaishankar : पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग; एस. जयशंकर यांनी पाकला सुनावले

पाकव्याप्त काश्मीर (Pakistan Occupied Kashmir) हा भारताचा भाग होता, आहे, आणि यापुढेही राहील ही आपली भूमिका कायम असून कोणतीही शक्ती या भूमिकेस आव्हान देऊ शकणार नाही, असे स्पष्ट प्रतीपादन केंद्रीय परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी आज येथे केले.

भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंंकर (S. Jaishankar) यांची प्रकट मुलाखत व प्रश्नोत्तराचा कार्यक्रम आज कॉलेज रोड वरील गुरुदक्षिणा हॉल मध्ये झाला. त्या वेळी ते बोलत होते. या मुलाखतीला अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, आ, देवयानी फरांदे, संयोजक श्वास फाउंडेशन अध्यक्ष प्रदीप पेशकार , श्रीराम दांंडेकर, विजय चैाथाईवाले, आदीसह उद्योजक, शहरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(हेही वाचा – North Central LS Constituency : अ‍ॅड. शेलार यांच्या सहाय्याने अ‍ॅड. उज्ज्वल निकम केस जिंकणार?)

डॉ. जयशंकर म्हणाले की, कलम 370 (Article 370) हटवल्यानंतर काश्मीरमध्ये सुधारणा होऊ लागल्या आहेत. आता पाकव्याप्त काश्मीरमध्येही काही घटना घडू लागल्या आहेत. लोकांची मानसीकता बदलुन भारताकडे कल वाढु लागला आहे. एक दिवस तोही भाग भारताशी जोडला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रगती आणि तंत्रज्ञानाचे संपूर्ण पॅकेज जनतेसमोर

चीनच्या ताब्यात भारताची भूमी विषयी ते म्हणाले की, चीनने भारताचा भूभाग बळकावला तो 1958 ते 1963 या काळात. त्या वेळी जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते. मात्र भारताचा हा भूभाग मोदी सरकारच्या काळात चीनने बळकावल्याचा कांगावा करीत काँग्रेस नेहरूंच्या चुकांचे खापर मोदी सरकारवर फोडत आहे. आज देशात दररोज 28 किमी लांब महामार्ग आणि 14 किमी लांब रेल्वे मार्गाचे काम होते. दहा वर्षांत विमानतळांची संख्या दुप्पट झाली. भारताच्या प्रगती आणि तंत्रज्ञानाचे संपूर्ण पॅकेज जनतेसमोर आहे. देशाचा जीडीपी सात टक्के आहे. प्रशासकीय कारभारात सुधारणा होऊन भ्रष्टाचाराला आळा बसला आहे. त्यामुळे परराष्ट्रात भारताची प्रतिमा निश्चित उंंचावली आहे. मुस्लिम देशात मंदिरासाठी जागा दिली जाते. हे त्याचे मूर्तीमंत उदाहरण आहे. आत्मनिर्भर भारतामुळे औद्योगिक प्रगती होत आहे. संशोधनाला बळ दिल्याने पहिल्यांंदा 5जी चा निर्माता भारत झाला आहे. शंभर देशांना कोरोना प्रतिबंधक लस भारताने पुरवली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या दहा वर्षांत भारताचे स्थान निश्चित उंचावले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कॅनडाच्या संबंधांविषयी ते म्हणाले की, त्यांच्या देशात होत असलेल्या गुन्ह्यांसाठी भारताला जबाबदार धरत आहे. पण, ते कधीही पुरावे देत नाही. फक्त आरोप करण्यापेक्षा कॅनडा सरकारने पुरावे सादर करावे. त्यांनी आतापर्यंत असा कुठलाही पुरावा दिला नाही.

आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉर

ऊर्जा समृद्ध इराणच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवरील सिस्तान-बलुचिस्तान प्रांतात स्थित, ओमानच्या आखातावरील चाबहार बंदर (Chabahar Port) आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉर नावाचा रस्ता आणि रेल्वे प्रकल्प वापरून भारतीय मालाला लँडलॉक अफगाणिस्तान आणि मध्य आशियापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवेशद्वार प्रदान करणार आहे. भारत, इराण, अफगाणिस्तान, आर्मेनिया, अझरबैजान, रशिया, मध्य आशिया आणि युरोपमधील मालवाहतुकीसाठी बहु-मोड वाहतूक प्रकल्प – भारत आणि इराणने 7,200 किमी लांबीच्या कॉरिडॉर साठी हे बंदर एक प्रमुख केंद्र रहाणार आहे, असे डॉ. जयशंकर (S. Jaishankar) यांनी स्पष्ट केले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.