PMRDA कडून १५० रस्त्यांसाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू

2302
PMRDA कडून १५० रस्त्यांसाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू

पुणे महानगर क्षेत्रातील पायाभूत सुविधा विकसित करण्याबरोबरच वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने प्रस्तावित १५० रस्त्यांसाठी जमीन संपादनाची प्रक्रिया पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) सुरू करण्यात आली आहे. तसेच, ८५ हेक्टर क्षेत्रावरील आरक्षित भूखंडासाठी भूसंपादन करण्यात येणार आहे. (PMRDA)

(हेही वाचा – Pakistani Spy : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या माजी मंत्र्यांच्या खाजगी सचिवाला बेड्या; ज्योती मल्होत्राशी संबंध ?)

जिल्ह्यातील मावळ, हवेली, मुळशी आणि शिरूरसह अनेक प्रमुख तालुक्यातील रस्त्यांचा यामध्ये समावेश असून, पुणे महानगर क्षेत्राच्या ६ हजार २४६.२६ चौरस किलोमीटर क्षेत्रफळात नियोजित शहरी विकास करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. (PMRDA)

(हेही वाचा – BMC : आमची मुंबई पालिका कुठे नेऊन ठेवली?)

पुणे महानगर क्षेत्रातील शहरी भागांचा झपाट्याने विस्तार होत आहे. यातील बहुतांश भागात वाहतूक कोंडीची समस्या जाणवत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने रस्त्यांचे जाळे निर्माण करण्याची मागणी सातत्याने नागरिकांकडून होत होती. त्यादृष्टीने भूसंपादन करण्याची प्रक्रिया २८ मे पासून पीएमआरडीएने सुरू केली आहे. त्यासाठी एका सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्यासाठीची निविदाही काढण्यात आली असून, या कंपनीकडून पायाभूत सुविधांचा विकास, आरक्षणांसह भूसंपादन केले जाईल. (PMRDA)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.