ऑपरेशन सिंदूरनंतर (Operation SINDOOR) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मीच भारत पाकिस्तान युद्ध थांबविल्याचा दावा अनेक वेळा केला होता. जी – ७ देशांच्या बैठकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ऑपरेशन सिंदूर अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे किंवा व्यापार कराराच्या प्रस्तावामुळे नव्हे, तर पाकिस्तानच्या विनंतीवरून तूर्त थांबविले आहे, असे सुनावले.
(हेही वाचा – Iran-Israel War : इराणमधील अणुऊर्जा केंद्रांवर हल्ला केल्याचा इस्त्रायली सैन्याचा दावा)
डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापारातील टेरिफ मुद्द्याने आपण भारताला नमते घ्यायला लावले, असे म्हटले होते. भारत वेळोवेळी ट्रम्प (Donald Trump) यांचे दावे खोडून काढत होता. परंतु हे दावे कनिष्ठ पातळीवर खोडले जात होते. आता थेट पंतप्रधानांनीच हे दावे खोडले आहेत. तसेच ट्रम्प यांच्या विनंतीनंतरही अमेरिकेला न जाऊन मोदींनी ट्रम्प यांना वेगळ्या प्रकारे शह दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी झालेल्या चर्चेदरम्यान ट्रम्प यांनी कॅनडाहून (Canada) परतताना त्यांना अमेरिकेतून जाण्याची विनंती केली होती, जेणेकरून दोन्ही नेते भेटू शकतील. परंतु पंतप्रधान मोदींनी हा प्रस्ताव नाकारला. जर पंतप्रधान मोदी अमेरिकेत गेले असते तर पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर (Asim Munir) देखील त्याच वेळी तेथे उपस्थित राहिले असते. अशा परिस्थितीत, ट्रम्प पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील मध्यस्थीचा मुद्दा उपस्थित करू शकतात अशी भीती होती. भारताने हा संभाव्य राजकीय संदेशही स्पष्टपणे नाकारला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community