PM Modi In Abu Dhabi : भारत-युएई एकमेकांच्या विकासात भागीदार; पंतप्रधान मोदींकडून भारत- युएई संबंधांना उजाळा

PM Modi In Abu Dhabi : युएई भारताचा तिसरा मोठा ट्रेड पार्टनर आहे, तर सातवा मोठा इन्व्हेस्टर आहे. आमच्यात जे करार झाले आहेत, त्या करारांमुळे टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशनमध्ये प्रगती झाली आहे.

213
PM Modi In Abu Dhabi : भारत-युएई एकमेकांच्या विकासात भागीदार; पंतप्रधान मोदींकडून भारत- युएई संबंधांना उजाळा
PM Modi In Abu Dhabi : भारत-युएई एकमेकांच्या विकासात भागीदार; पंतप्रधान मोदींकडून भारत- युएई संबंधांना उजाळा

अबूधाबी येथील मंदिराच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी युएईमध्ये दाखल झाले आहेत. १३ फेब्रुवारी रोजी पंतप्रधानांनी ‘शेख झायेद स्टेडियम’वर भारतीय समुदायाच्या अहलान मोदी (Ahlan Modi) कार्यक्रमाला संबोधित केले. या वेळी पंतप्रधानांनी संयुक्त अरब अमिराती आणि भारताच्या व्यापारी संबंधांना उजाळा दिला. (PM Modi In Abu Dhabi)

(हेही वाचा – 63rd Maharashtra State Art Exhibition: ग्राफिक डिझायनर अरुण काळे यांना ‘वासुदेव गायतोंडे जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान)

१० वर्षांत मी सातव्यांदा युएईला आलो

युएई भारताचा तिसरा मोठा ट्रेड पार्टनर आहे, तर सातवा मोठा इन्व्हेस्टर आहे. आमच्यात जे करार झाले आहेत, त्या करारांमुळे टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशनमध्ये प्रगती झाली आहे. १० वर्षांत मी सातव्यांदा युएईला आलो आहे. भारत-युएईने जे साध्य केले आहे, ती भागिदारी आहे. युएईच्या प्रगतीमध्ये भारतियांचे मोठे योगदान आहे, असे पंतप्रधान मोदी या वेळी म्हणाले.

दोन्ही देशांचे इतिहासकालीन नाते

ते पुढे म्हणाले की, कोरोनाकाळात युएईतील भारतियांविषयी चिंता नव्हती. त्यांची योग्य काळजी घेतली जाणार, हे माहिती होते. आपल्या दोन्ही देशांचे इतिहासकालीन नाते आहे. युएईमध्ये लवकरच युपीआय चालू होणार आहे, असे सांगून पंतप्रधानांनी या वेळी काही वाक्ये अरबी भाषेत बोलली. काळाच्या कलमाने आपण इतिहासाचे लेखन करत आहोत. आपण चांगल्या भविष्याची चांगली सुरुवात करत आहोत, असे ते म्हणाले. (PM Modi In Abu Dhabi)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.