Tree Plantation : नवी मुंबईच्या जैवविविधतेत भर घालणाऱ्या ५ हजारांहून अधिक देशी वृक्षरोपांची लागवड

78
Tree Plantation : नवी मुंबईच्या जैवविविधतेत भर घालणाऱ्या ५ हजारांहून अधिक देशी वृक्षरोपांची लागवड

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार व्यापक प्रमाणात लोकसहभाग घेऊन मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करुन साजरा करण्यात आला. आयुक्तांनी केलेल्या आवाहनास अनुसरून विद्यार्थी, महिला, युवक, प्रौढ व ज्येष्ठ नागरिक अशा सर्वच निसर्गप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांनी आठही विभागांतील वृक्षारोपण व स्वच्छता कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. (Tree Plantation)

या दिवशी विविध ठिकाणी ५ हजाराहून अधिक स्थानिक देशी प्रजातींच्या वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. त्याचप्रमाणे महानगरपालिकेने केलेल्या जाहीर आवाहनास अनुसरून १५० हून अधिक संस्था व व्यक्ती यांनी उद्यान विभागाशी संपर्क साधून अर्ज करीत वृक्षरोपे तसेच वृक्षारोपणासाठी योग्य जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. या मागणीनुसार साधारणत: १२ हजार देशी वृक्षरोपांचे वाटप करण्यात आले. (Tree Plantation)

(हेही वाचा – Bala Nandgaonkar: राज ठाकरेंसोबतच्या बैठकीत नेमकी काय चर्चा?, मनसेचे नेते म्हणाले…)

या झाडांची करण्यात आली लागवड 

यामध्ये विशेषत्वाने नेरूळ विभागात नेरूळ पोलीस स्टेशन समोरील मोकळ्या जागेत बांबूच्या ३७५ झाडांची लागवड करण्यात आली. तसेच ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे २५०० बांबूची व २५० जांभूळ झाडांची लागवड करण्यात आली आहे. बेलापूर पामबीच येथे २५० बांबूची लागवड करण्यात आली असून तुर्भे-सानपाडा विभागात संवेदना उद्यान, सेक्टर १० येथे ६५ देशी प्रजातींची करंज, ताम्हण, बहोनिया, एलोस्निया, बेलपत्र अशी झाडे लावण्यात आली आहेत. (Tree Plantation)

तुर्भे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी ५०० हून अधिक इतक्या मोठ्या संख्येने आकाशनिंब, पिंपळ, वड, गुलमोहर, आवळा अशा पानाफुलांनी बहरणाऱ्या मोठ्या झाडांची लागवड करण्यात आली असून निसर्ग उद्यान, कोपरखैरणे येथे प्रामुख्याने ५०० आंब्याची झाडे लावण्यात आली आहेत. सुनील गावस्कर मैदान, सेक्टर २, बेलापूर येथे बकुळ ताम्हण इ. ४० झाडांची लागवड करण्यात आली असून सेंट्रल पार्क, घणसोली येथे बकुळ, कडूनिंब, पिंपळ, अर्जुन, आंबा, पारिजातक, चाफा, टॅबोबिया, कांचन, करंज अशा विविध प्रकारच्या ६५ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे. (Tree Plantation)

(हेही वाचा – Pothole : खड्डे आणि दुरूस्‍तीयोग्‍य रस्‍त्‍यांच्‍या तक्रारींसाठी नागरिकांकरता महापालिकेची काय आहे व्यवस्था, जाणून घ्या!)

पाम बीच रोड घणसोली येथेही बकुळ, अर्जुन, कांचन, कडुनिंब, पारिजातक, टॅबोबिया अशा देशी झाडांची २५ वृक्षरोपे लावण्यात आली आहेत. सेक्टर १४, ऐरोली येथे नमुंमपा शाळा मैदान आणि पटनी रोड येथे साधारणत: ३७५ कडुनिंबाच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. दिघा येथील साने गुरुजी उद्यानातही जांभूळ, ताम्हण, कडुनिंब, आकानिम व निलगिरी अशा ६५ देशी वृक्षरोपांची लागवड करण्यात आली आहे. याशिवाय शहरातील विविध स्वयंसेवी संस्था, शाळा-महाविद्यालये यांनीही आपल्या स्तरावर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण व अनुषांगिक कार्यक्रमांचे ठिकठिकाणी आयोजन केले होते. (Tree Plantation)

नवी मुंबई महानगरपालिका उद्यान विभागाच्या वतीने शहराच्या वृक्षसंवर्धनासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुयोग्य नियोजन करण्यात आले असून त्यामध्ये प्रामुख्याने फळेफुले देणाऱ्या व पक्ष्यांना आकर्षित करणाऱ्या आणि त्याव्दारे नवी मुंबईच्या जैवविविधतेत भर घालणाऱ्या स्थानिक देशी प्रजातींच्या वृक्षांचीच लागवड करण्यात येत असल्याची माहिती उद्यान विभागाचे उपआयुक्त दिलीप नेरकर यांनी दिलेली आहे. (Tree Plantation)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.