Grading : घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी ‘ही’ शोभेची झाडे लावा…

156

झाडांचे महत्त्व आपल्याला माहितच आहे. अनेक लोकांना गार्डनिंग करण्याची आवड असते. पण घरात कोणती झाडे लावायला हवी हे कळत नाही. मग घरात अशी झाडं लावा जी वास्तुच्या दृष्टीनं शुभ मानले जातात. वास्तू नियमांनुसार, सुंदर झाडं देखील घरातील सकारात्यक म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी वाढवतात आणि घरातील नकारात्मक म्हणजेच निगेटिव्ह एनर्जी काढून टाकतात. घरात काही झाडं लावल्यानं घरातील वातावरण प्रसन्न होते, तसे झाल्यास तुमचे मन प्रसन्न राहते. त्यामुळे तुमचे कामामध्ये लक्ष लागते.

​क्रॅसुलाचे झाड

तुम्ही क्रॅसुलाचे झाड लावू शकता. हे झाड घरात ठेवल्यावर तुमच्या आयुष्यात कधीही आर्थिक संकट येत नाहीत. पौराणिक मान्यतेनुसार, क्रासुलाचे झाड भगवान कुबेरला प्रचंड आवडते. घराच्या उत्तर दिशेला हे रोप लावल्यानं पैशांची कमी राहत नाही. हे झाडं छोटे असाल्याने तुम्ही हे छोटे कुठेही ठेवू शकता. या झाडाला पाहून तुम्हाला फ्रेश वाटू लागेल.

बेलाचे झाड

बेलाचे झाड देखील शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, बेलाचे पान भगवान भोलेशंकर वास्तव्य करतात आणि ज्या घराच्या दारावर स्वतः भगवान शंकराची नजर असते त्या घरात दारिद्र्य नसते असे मानतात. वैज्ञानिकदृष्या बेलाच्या झाडाला खूप महत्त्व असते.

(हेही वाचा Independence Day : येत्या १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान पुन्हा घरोघरी तिरंगा फडकणार!)

बांबू प्लांट

घरासमोर बांबूचे रोप असणे देखील खूप शुभ मानले जाते. वास्तूनुसार ईशान्य दिशेला किंवा उत्तर दिशेला ठेवल्यास घरात पैशांचा पाऊस पडू लागतो. घरासमोर बांबूचे रोप कधीच गरीब होऊ देणार नाही. त्याचप्रमाणे घरातील वातावरण ताजे राहते

डाळिंबाचे रोप

डाळिंब हे केवळ चव आणि आरोग्याच्या दृष्टीने उत्तम आहे असे नाही तर त्याचे रोप माणसाला आर्थिक आघाडीवर समृद्ध बनवते. घरासमोर डाळिंबाचे रोप लावल्याने कर्जापासून मुक्ती मिळते. डाळिंबाची लागवड करताना हे लक्षात ठेवा की ते घराच्या आग्नेय किंवा नैऋत्य दिशेला लावू नये.

​मनी प्लांट

घरातील संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून मनी प्लांट सर्वात लोकप्रिय आहे. ही वनस्पती जितक्या वेगाने वाढेल तितक्या वेगाने घरात पैसा येतो. घरामध्ये मनी प्लांट लावताना हे लक्षात ठेवा की ते आग्नेय दिशेला लावावे. मनी प्लांटचे रोप कधीही थेट जमिनीवर ठेवू नका. हे झाड कमी जागा व्यापते त्यामुळे कोणिही हे झाड घरी लावू शकते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.