Pets Registration: पाळीव प्राणी घरी पाळणाऱ्यांच्या घरी धडकणार महापालिकेची पथके, हे आहे कारण

2263
Pets Registration: पाळीव प्राणी घरी पाळणाऱ्यांच्या घरी धडकणार महापालिकेची पथके, हे आहे कारण
Pets Registration: पाळीव प्राणी घरी पाळणाऱ्यांच्या घरी धडकणार महापालिकेची पथके, हे आहे कारण

 विशेष प्रतिनिधी,मुंबई

मुंबई महानगरपालिकेने (Mumbai municipal corporation) यूथ ऑर्गनायझेशन इन डिफेन्स ऑफ ऍनिमल्स आणि झीमॅक्स टेक सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या सेवाभावी संस्थेच्यावतीने मुंबईतील पाळीव प्राण्यांची नोंदणी (Pets Registration)करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेद्वारे मुंबईतील विविध सदनिका, बंगले, सोसायटीमधील नागरिकांकडे असलेल्या पाळीव प्राण्यांची माहिती गोळा करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी गट प्रत्येक सोसायटीला भेट देणार आहेत. मुंबईकरांनी या मोहिमेत सहभाग घेऊन कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून(Mumbai municipal corporation) करण्यात येत आहे.

(हेही वाचा- Dharavi redevelopment project : धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत खासदार राहुल शेवाळे स्पष्ट बोलले, म्हणाले… )

‘मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्प’ 

प्राणीकल्याण करणे व त्यासोबतच प्राण्यांपासून मानवामध्ये होणारे संक्रमण टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे (Mumbai municipal corporation) आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी (Ashwini joshi)यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याच अनुषंगाने भटक्या श्वानांच्या चाव्यामुळे माणसांना होणाऱ्या संक्रमणाचा धोका कमी करणे तसेच श्वानांना आवश्यक आरोग्य सुविधा पुरवण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने ‘मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्प’ अंतर्गत भटक्या श्वानांच्या रेबीज प्रतिबंधक लसीकरणासाठी नुकतेच निरंतर अभियान हाती घेतले आहे. त्यानंतर आता पाळीव प्राण्यांची देखील नोंदणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.(Mumbai municipal corporation)

मुंबईतील प्रत्येक सोसायटीला भेट

मुंबई शहरातील पाळीव प्राण्यांच्या(Pets Registration ) लोकसंख्येबद्दल महत्त्वाची माहिती गोळा करण्यासाठी एक व्यापक सर्वेक्षण करत आहोत. (Mumbai municipal corporation) यामध्ये प्राण्यांचे आरोग्य, लसीकरण स्थिती आणि नोंदणी याविषयी तपशील समाविष्ट असेल. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी महानगरपालिकेचे प्रतिनिधी मुंबईतील प्रत्येक सोसायटीला भेट देणार आहेत.(Mumbai municipal corporation)

मुंबईकरांचा सहभाग महत्त्वाचा! 

पाळीव प्राण्यांच्या(Pets Registration ) निरोगी आयुष्यासाठी तसेच रेबीज आणि लेप्टोस्पायरोसिस यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मुंबईकरांनी देखील महानगरपालिकेला सहकार्य करावे. त्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर आपल्याकडे असलेल्या पाळीव प्राण्यांची नोंद करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.(Mumbai municipal corporation)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.