Data Protection: जगभरातील २६० कोटी नागरिकांची वैयक्तिक माहिती लीक, अॅपल कंपनीचा धक्कादायक खुलासा

२०१३पासून २०२२ पर्यंतच्या दशकात महिती संरक्षण नियमांचं उल्लंघन होण्याचे प्रकार वाढले आहेत.

164
Data Protection: जगभरातील २६० कोटी नागरिकांची वैयक्तिक माहिती लीक, अॅपल कंपनीचा धक्कादायक खुलासा
Data Protection: जगभरातील २६० कोटी नागरिकांची वैयक्तिक माहिती लीक, अॅपल कंपनीचा धक्कादायक खुलासा

तंत्रज्ञानात आपण प्रगती करत असलो, तरीही वाढत्या तंत्रज्ञानामुळे (Data Protection) होणाऱ्या दुष्परिणामांनाही आपल्याला सामोरे जावे लागत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिपफेक, हॅकिंग आणि माहिती संरक्षण अशा विविध क्षेत्रांची चर्चा सध्या सुरू असतानाच अॅपल या प्रसिद्ध कंपनीने एका अहवालाद्वारे धक्कादायक माहिती उघडकीस आणली आहे.

“अॅपल” कंपनीने प्रसिद्ध केलेल्या या अहवालानुसार, गेल्या दोन वर्षांत जगभरातील २६० कोटी नागरिकांची माहिती लीक झाली आहे. मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतील प्राध्यापक डॉ. स्टुअर्ट मॅडनिक यांनी हे संशोधन करून अहवाल प्रसिद्ध केला आहे. २०१३पासून २०२२ पर्यंतच्या दशकात महिती संरक्षण नियमांचं उल्लंघन होण्याचे प्रकार वाढले आहेत. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे हॅकिंग आणि डेटा चोरीची प्रकरणं वाढली असून दिवसागणिक या प्रमाणात प्रचंड वाढ होत आहे. यातून कोणाची सुटका नाही, अशी भीतीही या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Tourism: भारतातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी इंडोनेशियाचे प्रयत्न सुरू, व्हिसामुक्त प्रवेशाची शक्यता)

एन्ड टू एन्ड प्रिस्क्रिप्शनसारख्या फिचर्समध्ये वाढ आवश्यक 
क्लाउड स्टोरेज ही पद्धत हल्ली डेटा साठवून ठेवण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी वापरली जाते, पण आता भविष्यात आपल्याला अधिक सुरक्षित पर्यायांचा विचार करावा लागणार आहे. एन्ड टू एन्ड प्रिस्क्रिप्शनसारख्या फिचर्समध्ये वाढ करणं गरजेचं असल्याची माहितीही या अहवालात देण्यात आली आहे.

हेही वाचा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.