Ganeshotsav 2023 : ‘येवा कोकण आपलाच असा’ म्हणत एन्जॉय करत आहेत कोकण ट्रीप

यंदा विविध राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून मोफत एस. टी., ट्रेनची व्यवस्था करण्यात आली होती.

121
Ganeshotsav 2023 : 'येवा कोकण आपलाच असा' म्हणत एन्जॉय करत आहेत कोकण ट्रीप
Ganeshotsav 2023 : 'येवा कोकण आपलाच असा' म्हणत एन्जॉय करत आहेत कोकण ट्रीप

गणेशोत्सव सण कोकणासह महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण. परंतु कोकणात घरोघरी गणपतीची स्थापना केली जाते. मुंबईतील चाकरमानी मोठ्या प्रमाणात मुंबईहून कोकणात गणेशोत्सवासाठी जातात. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून यंदा विविध राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून मोफत एस. टी., ट्रेनची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचा फायदा कोकणवासीयांपेक्षा जास्त राज्यातील इतर भागातील लोकांनीच कोकणात जाण्यासाठी अधिक केल्याचे दिसून येत आहे.

गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी विविध राजकीय पक्षांकडून जवळपास पाच हजार पेक्षा अधिक एसटी गाड्या आणि प्रायव्हेट बसेसची व्यवस्था कोकणवासीयांसाठी केली गेली होती. त्यातच काही विशेष गणपती स्पेशल ट्रेन देखील मोफत सोडण्यात आल्या होत्या. याचाच फायदा उचलत राज्यातील इतर भागातून मुंबईत आलेले पै पाहुणे देखील कोकणात या गाड्यांचा फायदा उचलत कोकण दर्शनाचा लाभ घेत असताना दिसत आहेत. यंदा गणेश चतुर्थी मंगळवारी आल्याने दोन ते तीन दिवस रजा टाकून आणि तसेही मुलांना गणेशोत्सवाची सुट्टी असल्याने घरी बसून काय करणार चला कोकण फिरून येऊया असं म्हणत मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठी माणसे देखील कोकण दर्शनासाठी आल्याचे दिसून येत आहे. ज्यामुळे ज्यांच्यासाठी केला होता एवढा अट्टाहास तेच या सुविधेपासून लांब राहिल्याचे दिसून येत आहे.

(हेही वाचा – Pune Weekly Market : पुणेकरांना वाहतूक कोंडी, अस्वच्छतेपासून दिलासा; शहरात आठवडी बाजाराबाबत नियमावली जाहीर)

मुंबईतील लालबाग येथे राहणारे ओमकार वालावलकर यांनी आपले वडील रमेश आणि आई रेश्मा यांच्यासाठी रेल्वेच्या थर्ड एसीचे तिकीट ब्लॅकने जवळपास सात हजार रुपये खर्च करून आणल्याचे देखील सांगितले. ओमकार वालावलकर सांगतात की, माझ्या वडिलांची बायपास झाली आहे. परंतु, एवढ्या वर्षात त्यांनी कधीही घरच्या गणपतीला जाणे थांबवले नव्हते त्यामुळे त्यांच्यासाठी म्हणून मला वाटेल तो खर्च करण्याची माझी तयारी होती. त्यातच विविध राजकीय पक्ष आणि नेत्यांनी मोफत गाडी सोडल्याचे ऐकून आनंद झाला परंतु त्याचा लाभ मात्र आम्हाला मिळालाच नाही. असे सांगायला देखील ओमकार विसरले नाहीत. गणेशोत्सवा दरम्यान रेल्वे गाड्या आणि एस. टी. फुल होऊन जातात आणि त्यामुळे कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना शर्तीचे प्रयत्न करावे लागतात. त्यातच ज्यांच्यासाठी म्हणून या गाड्या मोफत सोडण्यात आल्या होत्या त्याचा फायदा दुसऱ्यांनीच उचलण्याचे दिसून येत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.