राणी बागेतील Penguin पक्ष्यांना पडते जागा कमी; महापालिकेने उचलले ‘हे’ पाऊल

339
राणी बागेतील Penguin पक्ष्यांना पडते जागा कमी; महापालिकेने उचलले 'हे' पाऊल
  • सचिन धानजी, मुंबई 

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान प्राणीसंग्रहालयात उभारण्यात आलेल्या पेंग्विन (Penguin) कक्षातील हम्बोल्ट पेंग्विनसाठी आता पिंजऱ्यातील जागा कमी पडत असून आता या पिंजऱ्यातील पेंग्विनची संख्या वाढत असल्याने आता पिंजऱ्यांचाही विस्तार करण्यात येणार आहे. सध्या या पिंजऱ्यात २५ पेंग्विनची क्षमता असून ही क्षमता वाढवून ४० पर्यंत केली जाणार आहे. भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयात अर्थात राणी बागेत पेंग्विन पाहुण्याचे आगमन २०१२ मध्ये झाल्यानंतर या पेंग्विनची संख्या सध्या २१ पर्यंत पोहोचली आहे.

सप्टेंबर २०१२ मध्ये १० नर आणि १० मादी याप्रमाणे २० पक्षी प्राणीसंग्रहालयात आणण्याकरता रितसर परवानगी मिळाल्यानंतर महापालिकेने महापालिकेने सध्या ३ नर आणि ३ मादी हम्बोल्ट पेंग्विन (Penguin) खरेदी केले होते. यातील एक पेंग्विन पक्षी मृत पावल्यानंतर या पेंग्विनच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. थायलंडमधील गोवा ट्रेड फार्मिग कंपनी लिमिटेड, थायलँड येथील कंपनीच्या माध्यमातून प्रत्येकी ४१ लाख रुपये याप्रमाणे सुमारे अडीच कोटी रुपये खर्च करून हे हम्बोल्ट पेग्विन भारतात आणण्यात आले होते. त्यामुळे पाच हम्बोल्ट पेग्विन पक्ष्यांची संख्या वाढवून आता २०१३ नंतर तब्बल १२ वर्षांत ही संख्या २१ वर पोहोचली आहे.

(हेही वाचा – मुंबईतील ‘वेव्हज’ परिषद मनोरंजन क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी ‘दावोस’ ठरणार; DCM Eknath Shinde यांचे विधान )

पेंग्विन (Penguin) पक्ष्यांसाठी राणीबागेत १०० चौरस मीटरचा पिंजरा बांधण्यात आला आहे. याच्या ५० टक्के क्षेत्रफळाच्या जागेवर पाणथळ उपलब्ध करून देण्यात आले आहे, तर उर्वरीत जागेत पक्ष्यांना त्यांच्या नैसर्गिक गरजा भागवण्यासाठी गुहा, बीळ तसेच बसण्याकरता मोठे दगड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हम्बोल्ट पेंग्विन प्रामुख्याने दक्षिण अमेरिकेतील मध्य चिलीच्या किनारपट्टीत समशीतोष्ण कटिबंधात आढळतो. त्याप्रमाणे राणी बागेतील एक्स्प्लोरेशन सेंटरमधील वातावरणही पेंग्विनच्या (Penguin) आरोग्याच्या दृष्टिकोनातून अनुकूल बनवण्यात आले आहे. या पिंजऱ्याची क्षमता ही २५ पक्ष्यांएवढी आहे. पण सध्या ही संख्या २१ एवढी आहे. त्यामुळे ही जागा कमी पडत असल्याने या पिंजऱ्याचा विस्तार करून याची क्षमता ४० पर्यंत केली जाणार आहे. यासाठी

इंटरप्रिटेशन सेंटर इमारतीचा उत्तरेकडील बाजूचा दर्शनी भाग काचेच्या सहाय्याने सुशोभित करण्यात येणार आहे. या बाजुस असलेल्या अतिरिक्त जागेवर प्लॅटफॉर्म बांधून आणि पेंग्विन प्रदर्शनीच्या मागील बाजूंना तसेच छतावर अतिरिक्त अॅक्रेलिक पॅनेलबसवून पेंग्विन (Penguin) प्रदर्शनीच्या जागेत वाढ करण्यात येणार आहे. या प्राणीसंग्रहालयाचे संचालक संजय त्रिपाटी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पेंग्विन पक्ष्याच्या पिंजऱ्याचा विस्तार करून सध्याच्या २५ पक्ष्य्यांच्या तुलनेत ही क्षमता ४० एवढी केली जाणार असल्याचे सांगितले. याचे काम लवकरच हाती घेतले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा – समृद्धी महामार्गावरील आमने नोड बीकेसी, नोएडाप्रमाणे विकसित होणार; DCM Eknath Shinde यांचे प्रतिपादन)

या पेंग्विनचे आयुष्य : सुमारे ३० वर्षे

अंडी देण्याचा काळ : वर्षातून दोनदा

किती दिवसांमध्ये देतात पिल्लांना जन्म : ४० दिवस

सध्या किती आहे पेंग्विन पक्षी : तीन पिल्लांसह एकूण २१ पक्षी

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.