Paytm Shares: ‘Paytm’ला दिलासा, अमेरिकन कंपनीने केली गुंतवणूक; वाचा सविस्तर…

229
Paytm Shares: 'Paytm'ला दिलासा, अमेरिकन कंपनीने केली गुंतवणूक; वाचा सविस्तर...
Paytm Shares: 'Paytm'ला दिलासा, अमेरिकन कंपनीने केली गुंतवणूक; वाचा सविस्तर...

अमेरिकन बहुराष्ट्रीय गुंतवणूकदार कंपनीने Paytmची मूळ कंपनी वन ९७ कम्युनिकेशन्समध्ये २४४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI)बंदीनंतर पेटीएमवर (Paytm) वाईट वेळ आली आहे. पेटीएमला अमेरिकेकडून (Paytm Shares) मोठा दिलासा मिळाला आहे. एका अमेरिकन बहुराष्ट्रीय गुंतवणूकदार कंपनीने paytmची मूळ कंपनी वन ९७ कम्युनिकेशन्समध्ये २४४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

(हेही वाचा- Massive Wedding Fraud : सामूहिक विवाह योजनेतील ५१ हजार हडपण्यासाठी बाहुल्यावर चढले बनावट नवरदेव; योगी सरकार तात्काळ उपाययोजना करणार )

अमेरिकन बहुराष्ट्रीय गुंतवणूकदार कंपनी मॉर्गन स्टॅनलीने पेटीएममध्ये ०.८ टक्के हिस्सादेखील खरेदी केला आहे. मॉर्गन स्टॅनलीची आशियामध्ये व्यवसाय करणारी कंपनी मॉर्गन स्टॅनल आशिया सिंगापूर प्रायव्हेट लिमिटेडने पेटीएमच्या मूळ कंपनीचे ५० लाख शेअर्स विकत घेतले आहेत. यासाठी कंपनीने पेटीएमच्या प्रत्येक शेअरची किंमत ४८७.२ रुपये निश्चित केली आहे.

रिझर्व बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँकेवर बंदी घातल्यानंतर तिच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. दोन दिवसांत कंपनीचे शेअर्स २० टक्क्यांनी घसरले आहेत. हे ४८७.२० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. पेटीएमचे करपूर्व उत्पन्न (EBITDA)३०० ते ५०० कोटी रुपयांनी कमी होऊ शकते, असा अंदाज रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या कारवाईनंतर पेटीएमचा आहे. अमेरिकन कंपनीने पेटीएमवर विश्वास दाखवल्याने शेअरला स्थैर्य मिळणे अपेक्षित आहे.

गेल्या वर्षी वॉरेन बफेटच्या बर्कशायर हॅथवेने कंपनीत ५ वर्षे गुंतवणूक केल्यानंतर पेटीएममधील आपला संपूर्ण हिस्सा तोट्यात विकला. तेव्हा पेटीएमच्या शेअरची किंमत ८७७.२० रुपये होती.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.