• होम
  • सत्ताबाजार
    • महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • समाजकारण
  • विशेष
  • संरक्षण
  • खेळियाड
    • ऑलिम्पिक २०२४
  • लाइफ स्टाइल
  • क्राईम पोस्ट
  • पंचनामा
  • परिवहन
  • वेब स्टोरी
Search
Hindhusthanpost.com
हिंदी
29.9 C
Mumbai
Hindhusthanpost.com
Thursday, May 15, 2025
Facebook
Instagram
Twitter
Youtube
हिंदी
  • होम
  • सत्ताबाजार
    • महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • समाजकारण
  • विशेष
  • संरक्षण
  • खेळियाड
    • ऑलिम्पिक २०२४
  • लाइफ स्टाइल
  • क्राईम पोस्ट
  • पंचनामा
  • परिवहन
  • वेब स्टोरी
Home समाजकारण Bank Account Hack : ठाण्यात ‘पेमेंट गेटवे’चे खाते हॅक, २५ कोटींची फसवणूक
  • समाजकारण

Bank Account Hack : ठाण्यात ‘पेमेंट गेटवे’चे खाते हॅक, २५ कोटींची फसवणूक

भारतातील अनेक कंपन्या आणि लोकांना लक्ष्य केले जाणार असल्याची माहिती दिली आहे

October 9, 2023
118
Facebook
Twitter
WhatsApp
Email
    Bank Account Hack : ठाण्यात 'पेमेंट गेटवे'चे खाते हॅक, २५ कोटींची फसवणूक
    Bank Account Hack : ठाण्यात 'पेमेंट गेटवे'चे खाते हॅक, २५ कोटींची फसवणूक

    सायबर गुन्हेगारांच्या टोळक्याने पेमेंट गेटवे सेवा (Payment gateway account hacked) पुरवणाऱ्या कंपनीचे बँक खाते हॅक (Bank Account Hack) करून वेगवेगळ्या बँक खात्यांतून १६ हजार १८० कोटींचे व्यवहार केले आहेत, तर २५ कोटींची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. पंजाब उगले यांनी दिली.

    पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही फसवणूक बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघड झाले. ठाणे सायबर विभागाने याप्रकरमी ६ ऑक्टोबर २०२३ रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

    ठाणे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने याप्रकरणी संजय सिंग, अमोल आंधळे, अमन, केदन, समीर दिघे, जितेंद्र पांडे आणि अन्य एका अज्ञात व्यक्तिविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील आरोपी जितेंद्र पांडे याने आठ ते दहा वर्षे बँकांमध्ये रिलेशनशिप आणि सेल्स मॅनेजर म्हणून काम केले आहे. या प्रकरणात मोठे रॅकेट असून भारतातील अनेक कंपन्या आणि लोकांना लक्ष्य केले जाणार असल्याची माहिती दिली आहे.

    श्रीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह माहिती-तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

    एका अज्ञात व्यक्तीने सेफेक्स पे आउट कंपनी सॉफ्टवेअर हॅक करून २५ कोटी रुपयांचा अपहार केला. त्यामुळे कंपनीच्या तक्रारीवरून ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह माहिती-तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास ठाण्याच्या सायबर सेलमार्फत करण्यात येत आहे. हा तपास सुरू असताना फसवणुकीच्या २५ कोटींपैकी १ कोटी ३९ लाख १९ हजार २६४ एवढी रक्कम रियाल इंटरप्रायजेसच्या नावे असलेल्या एचडीएफसीच्या बँक खात्यात वळती झाल्याची माहिती ठाणे शहर गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. पंजाब उगले यांनी दिली आहे.

    Join Our WhatsApp Community

    Get The Latest News!
    Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.

    Check your inbox or spam folder to confirm your subscription.

    • TAGS
    • Bank Account Hack
    Facebook
    Twitter
    WhatsApp
    Email
      Previous articleAfghanistan Earthquake : मृतांचा आलेख चढताच
      Next articleIsrael-Palestine Conflict : इजिप्शियन पोलिसांकडून दोन इस्रायली पर्यटकांची गोळ्या झाडून हत्या
      HindusthanPost Bureau

      Latest News

      • Balochistanच्या जाळ्यात चीन-पाकिस्तान फसलं?; नि. ब्रिगेडियर हेमंत महाजन नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या May 15, 2025
      • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचा ‘त्या’ विधानावरून यू-टर्न; म्हणाले, ‘…असे मी म्हणत नाही’ May 15, 2025
      • India Tour of England : आगामी इंग्लंड दौऱ्याकरिता महिला संघाची निवड जाहीर, टीम इंडियाची घोषणा कधी?, वाचा संपूर्ण बातमी May 15, 2025
      • Maharashtra : भटके विमुक्त समाजासाठी ऐतिहासिक निर्णय; राज्यामध्ये कुठेही मिळणार रेशनिंग, जात प्रमाणपत्रही घरपोच May 15, 2025
      • Deonar Dumping Ground वरून राजकारण तापले; गिधाडांचे आरोप आणि कचऱ्यातून बाहेर पडलेले जुने हिशोब… May 15, 2025
      Join Our WhatsApp Community

      Popular

      • Balochistanच्या जाळ्यात चीन-पाकिस्तान फसलं?; नि. ब्रिगेडियर हेमंत महाजन नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या May 15, 2025
      • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचा ‘त्या’ विधानावरून यू-टर्न; म्हणाले, ‘…असे मी म्हणत नाही’ May 15, 2025
      • India Tour of England : आगामी इंग्लंड दौऱ्याकरिता महिला संघाची निवड जाहीर, टीम इंडियाची घोषणा कधी?, वाचा संपूर्ण बातमी May 15, 2025
      • Maharashtra : भटके विमुक्त समाजासाठी ऐतिहासिक निर्णय; राज्यामध्ये कुठेही मिळणार रेशनिंग, जात प्रमाणपत्रही घरपोच May 15, 2025
      • Deonar Dumping Ground वरून राजकारण तापले; गिधाडांचे आरोप आणि कचऱ्यातून बाहेर पडलेले जुने हिशोब… May 15, 2025
      Tweets by HindusthanPostM

      © Hindusthan Post All Rights Reserved

      • About Us
      • Contact Us
      • Disclaimer
      • Terms Of Service
      • Privacy Policy
      This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. View more
      Accept
      Decline