प्रवाशांनो लक्ष द्या! Dadar Railway स्थानकातील गैरसोय टाळण्यासाठी उचलण्यात आलं ‘हे’ पाऊल  

191
प्रवाशांने लक्ष द्या! Dadar Railway स्थानकातील गैरसोय टाळण्यासाठी उचलण्यात आलं ‘हे’ पाऊल  
प्रवाशांने लक्ष द्या! Dadar Railway स्थानकातील गैरसोय टाळण्यासाठी उचलण्यात आलं ‘हे’ पाऊल  
Dadar Railway : रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची रेलचेल असणारं मुंबईतील (Mumbai) एक महत्त्वाचं स्थानक म्हणजे दादर. याच दादर रेल्वे स्थानकात (Dadar Railway Station) प्रवाशांच्या वाढत्या गर्दीला पाहता मागील काही वर्षांमध्ये अनेक बदल करण्यात आले. फलाटांपासून ते अगदी पुलांपर्यंच हे बदल झाले आणि आता यात आणखी एका बदलाची भर पडणार आहे.  (Dadar Railway)
पादचारी पूल बंद…
दादर रेल्वे स्थानकातील पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) फलाट क्रमांक 4 वर असणाऱ्या पादचारी पुलाच्या दुरूस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे. ज्यामुळं या पुलाच्या पायऱ्या 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील. ज्यामुळं प्रवाशांना पर्यायी व्यवस्थेचा वापर करण्याचं आवाहन पश्चिम रेल्वेच्या वतीनं करण्यात आलं आहे.
(हेही वाचा – ”भ्रष्टाचार अन् काँग्रेस हे समानार्थी शब्द” National Herald प्रकरणात छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचा कॉंग्रेसला टोला)
फक्त दादरच नव्हे, तर गोरेगाव स्थानकातही अशाच कारणानं पादचारी पूल बंद ठेवण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर येणाऱ्या गोरेगाव स्थानकात (Goregaon Station) उत्तरेला असणाऱ्या जुन्या पादचारी पुलाची पुनर्बांधणी करण्यासाठी त्याचं तोडकाम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळं हा पूलसुद्धा बंद करण्यात आला आहे. ऑक्टोबर 2025 पर्यंत हे काम सुरू राहणार असून, त्यादरम्यान पूल पूर्णपणे बंद असेल. दरम्यानच्या काळात प्रवाशांना नव्या पुलाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.