-
प्रतिनिधी
हॉटेल, रेस्टॉरंट, धाबे आणि कॅटरिंग व्यावसायिकांकडून शुद्ध पनीर ऐवजी चीज ॲनालॉगचा वापर केला जात असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. यामुळे ग्राहकांची फसवणूक होत असल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाने कठोर पावले उचलली आहेत. आता चीज ॲनालॉग वापरणाऱ्या आस्थापनांना मेनू कार्ड आणि डिस्प्ले बोर्डवर त्याचा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक असेल. तसे न केल्यास त्यांचा परवाना निलंबित होईल, असा आदेश अन्न सुरक्षा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी जारी केला आहे. (Paneer Adulteration)
(हेही वाचा – IPL 2025, RCB vs PBKS : रजत पाटीदारने मोडला सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम)
नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांतील भेसळीचा मुद्दा गाजला होता. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी भेसळ रोखण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. शुद्ध पनीरपेक्षा स्वस्त असलेले चीज ॲनालॉग हॉटेल, रेस्टॉरंट आणि फास्ट फूड विक्रेते मोठ्या प्रमाणात वापरतात, ज्यामुळे ग्राहकांची आर्थिक फसवणूक होते. या पार्श्वभूमीवर सरकारने कारवाईचे आश्वासन दिले होते. (Paneer Adulteration)
(हेही वाचा – उद्धव आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर मंत्री Nitesh Rane यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, स्वत:च्या अस्तित्वासाठी…)
अधिकाऱ्यांना हॉटेल, रेस्टॉरंट आणि फास्ट फूड विक्रेत्यांवर धाडी घालून शुद्ध पनीर किंवा चीज ॲनालॉग वापरले जात आहे याची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चीज ॲनालॉग वापरणाऱ्यांना त्याचा उल्लेख मेनू कार्डवर करणे अनिवार्य आहे. तसेच, हॉटेल असोसिएशनच्या कार्यशाळा घेऊन कायदेशीर तरतुदींची माहिती देण्याचे आदेश आहेत. या निर्णयामुळे ग्राहकांच्या हिताचे रक्षण होईल, अशी अपेक्षा आहे. (Paneer Adulteration)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community